Realme X चा ऑफिशल पोस्टर मधून समोर आली फोनची डिजाइन, पॉप-अप सेल्फी कॅमेरा सह होईल लॉन्च

ओपोचा सब-ब्रँड म्हणून आपली सुरवात करणारी रियलमी आता आपला पुढला स्मार्टफोन Realme X लॉन्च करण्यासाठी तयार दिसत आहे. कंपनी या आठवड्यात चीन मध्ये हा डिवाइस लॉन्च करेल. पण लॉन्चच्या आधी कंपनी कडून या स्मार्टफोन संबंधित अनेक लीक समोर आले आहेत. आता स्मार्टफोनचा ऑफिशल पोस्टर समोर आला आहे.

हा ऑफिशियल पोस्टर ऑनलाइन शेयर केला गेला आहे. पोस्टर मध्ये फोनची डिजाइन सादर करण्यात आली आहे, ज्यामुळे आपण लॉन्च आधीच बघू शकतो कि डिवाइस मध्ये पॉप-सेल्फी कॅमेरा आणि अजून काय असेल खास.

शेयर केलेल्या फोटो मध्ये रियलमी एक्स दोन ग्रेडिएंट कलर ऑप्शंस ब्लू आणि वाइट मध्ये दिसत आहे. डिवाइसच्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही, ज्यावरून अंदाज लावला जात आहे कि फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असेल.

स्पेसिफिकेशन्स
Realme X चे स्पेसिफिकेशन्स पाहता आता पर्यंत समोर आलेल्या लीक्स नुसार या फोन मध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले मिळेल जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड असेल. या फोन मध्ये 91.2 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो असेल. विशेष म्हणजे एमोलेड डिस्प्ले असल्याचे समजल्यानंतर असे पण बोलले जात आहे कि Realme X इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह बाजारात येईल.

Realme X एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर सादर केला जाऊ शकतो, सोबतच Realme X क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालेल. कंपनी फोन तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करू शकते ज्यात 6जीबी रॅम + 64जीबी मेमरी, 6जीबी रॅम + 128जीबी मेमरी व 8जीबी रॅम + 128जीबी मेमरी असेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Realme X के बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात 48-मेगापिक्सलचा Sony IMX586 प्राइमरी सेंसर दिला जाईल जो एफ/1.7 अपर्चरला सपोर्ट करेल. यासोबतच फोन मध्ये 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर असेल. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 16-मेगापिक्सलचा पॉप-अप कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Realme X मध्ये VOOC 3.0 फास्ट चार्ज सपोर्ट वाली बॅटरी दिली जाऊ शकते जिची पावर लीक्स मध्ये 3,700एमएएच सांगण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असल्याचे पण लीक्स मध्ये समोर आले आहे. किंमत पाहता लीक नुसार फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 1599 युआन (जवळपास 16,500 रुपये) मध्ये लॉन्च केला जाईल तर फोनच्या सर्वात मोठ्या वेरिएंटची किंमत 1999 युआन (जवळपास 20,000 रुपये) असेल. बोलले जात आहे कि Realme X ब्लॅक, ब्लू आणि वाइट कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल.

सोर्स: 1, 2

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here