Realme 11 Pro सीरीजची होणार आहे भारतात एंट्री, 8 जूनला लाँच होईल 200MP Camera Phone

Highlights

  • लाँच इव्हेंट 8 जून दुपारी 12 वाजता सुरु होईल.
  • से रियलमी 11 प्रो 5जी आणि 11 प्रो+ 5जी फोन भारतीय बाजारात येतील.
  • Realme 11 Pro 5G चीनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 चिपसेटसह लाँच

रियलमी इंडिया फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की ते आपली नवीन ’11 प्रो 5जी’ सीरीज येत्या 8 जूनला भारतात लाँच जाणार आहेत. ह्या सीरीज अंतगर्त realme 11 Pro 5G आणि realme 11 Pro+ 5G फोन भारतीय बाजारात येतील.

रियलमी 11 प्रो 5जी सीरीज लाँच डिटेल

कंपनीनं ऑफिशियल घोषणा करून सांगितलं आहे की realme 11 Pro Series 8 जूनला भारतात लाँच होईल. हा एक मोठा लाँच इव्हेंट असेल जो राजधानी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केला जाईल. हा लाँच इव्हेंट 8 जून दुपारी 12 वाजता सुरु होईल. ह्या इव्हेंटच्या मंचावरून रियलमी 11 प्रो 5जी आणि 11 प्रो+ 5जी फोन भारतीय बाजारात येतील.

Realme 11 Pro सीरीज प्राइस (लीक)

लीक्सनुसार, रियलमी 11 प्रो 5जी फोन भारतात 22,000 ते 23,000 रुपयांदरम्यान लाँच केला जाऊ शकतो. ह्या किंमतीत 8जीबी रॅम मिळू शकतो. रियलमी 11 प्रो+ 5जी संबंधित लीक्समध्ये अंदाज लावला जात आहे की हा मोबाइल फोन 28,000 रुपयांच्या बजेटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. ह्या मॉडेलच्या 12जीबी व्हेरिएंटची किंमत 30,000 रुपयांच्या आसपास जाऊ शकते.

Realme 11 Pro 5G सीरिजचे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : चीनीमध्ये लाँच झालेल्या रियलमी 11 प्रो सीरीजमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1080 X 2412 पिक्सल रेजोल्यूशन, 360Hz टच सॅम्पलिंग रेट, 93.65 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट, पंच- सह 6.7-इंच FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर : Realme 11 Pro 5G चीनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे, जोडीला ग्राफिक्ससाठी माली-जी68 जीपीयू आहे.
  • रॅम आणि स्टोरेज : 11 प्रो मध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज आणि 11 प्रो प्लस मध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 1TB स्टोरेज आहे.
  • कॅमेरा : रियलमी 11 प्रो मध्ये मागे ड्युअल कॅमेरा आहे, ज्यात f/1.75 अपर्चर असलेला 108MP चा प्रायमरी कॅमेरा, OIS, 6P लेन्स आणि 2MP चा ड्युअल सेन्सर आहे. तर 11 प्रो प्लस मध्ये मागे ट्रिपल कॅमेरा आहे, ज्यात 200MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP ची अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे.
  • सेल्फी कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ चॅटसाठी 11 प्रो मध्ये 16MP फ्रंट आणि 11 प्रो प्लस मध्ये 32 एमपी कॅमेरा आहे.
  • बॅटरी : दोन्ही फोन्समध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी मिळते.
  • कनेक्टिव्हिटी : कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, 4जी एलटीई, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here