ASUS घेऊन येत आहे डुअल स्लाईडर पॅनल असेलला फोन, Samsung Galaxy A80 ला पण टाकेल मागे

Samsung ने अलीकडेच आपली गॅलेक्सी ए सीरीज वाढवत Galaxy A80 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन आपल्या अनोख्या डिजाईन मुळे अनेकांना आवडला आहे. Samsung Galaxy A80 रोटेटिंग स्लाईडर पॅनल वर बनवलेला आहे ज्यात बॅक पॅनल वर स्लाईड करता येतो आणि रियर कॅमेरा सेटअपच रोटेट होऊन फ्रंट कॅमेर्‍याचु जागा घेतो. या शानदार टेक्नॉलॉजी व डिजाईन नंतर आता टेक कंपनी ASUS पण काही नवीन करू पाहत आहे. Samsung ने रोटेटिंग स्लाईडर पॅनल वाला फोन लॉन्च केला आहे तर ASUS डुअल स्लाईडर फोन घेऊन येत आहे.

ASUS च्या या dual slider फोनची माहिती डच पब्लिकेशनने आपल्या रिपोर्ट मध्ये दिली आहे. या रिपोर्ट मध्ये ASUS कंपनी द्वारा सब्मिट करण्यात आलेला पेटेंट दाखवण्यात आला आहे. रिपोर्ट मध्ये खुलासा झाला आहे कि असूस ने 10 स्मार्टफोन वेरिएंट्स पेटेंट केले आहेत जे डुअल स्लाईडर पॅनल वर बनले आहेत. या पेटेंट्स मध्ये स्मार्टफोन्सची स्केच डिजाईन पण समोर आली आहे. या स्केच डिजाईन वरून फोनच्या फ्रंट आणि बॅक पॅनल सह याच्या लुक व डिजाईनची माहिती पण मिळाली आहे.

अनोखी असेल डिजाईन
ASUS पेटेंट वरून समजले आहे कि हा फोन फुल स्क्रीन सह येतील. फोनच्या तिन्ही कडा पूर्णपणे बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट दाखवण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर हॉरिजांटल शेप मध्ये कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये तीन होल दाखवण्यात आले आहे ज्यात दोन कॅमेरा सेंसर आणि एक फ्लॅश लाईट असू शकते. या फोटोजच्या कोणत्याही वेरिएंट मध्ये बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर किंवा स्पीकर ग्रिल दिसत नाही.

असा असेल डुअल स्लाईडर
नावावरून समजले असेल की ASUS च्या या फोन्स मध्ये दोन स्लाईडर पॅनल असतील. सध्या बाजारात असलेल्या स्लाईडर फोन्स मध्ये बॅक पॅनल वरच्या बाजूला स्लाईड होतो. या स्लाईडर पॅनल वर कॅमेरा सेंसर असतात. पण असूस च्या आगामी स्मार्टफोन्स मध्ये वर आणि खाली दोन्ही बाजूला स्लाईडर पॅनल असतील. एक स्लाईडर फोन बॉडी वर येईल तर दुसरा स्लाईडर फोन बॉडीच्या खाली स्लाईड होईल.

फोटोज मध्ये दाखवण्यात आले आहे वर स्लाईड होणार्‍या पॅनल वर फ्रंट कॅमेरा सेंसर दिले जातील. तर खाली स्लाईड होणार्‍या पॅनल वर स्पीकर ग्रिल असेल. या स्लाईडर वर स्पीकर सोबत माइक्रोफोन पण दाखवण्यात आला आहे. खाली स्लाईड होणार्‍या पॅनल च्या खालच्या भागात यूएसबी पोर्ट दिला जाईल. समोर आलेल्या फोटो मध्ये वर स्लाईड होणार्‍या पॅनल वर मध्ये सेल्फी कॅमेरा आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला फ्लॅश लाईट देण्यात आली आहे.

SOURCE

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here