Samsung Galaxy S20 चा स्वस्त वेरिएंट कंपनीच्या साइट वर झाला लिस्ट, येईल लवकरच

Samsung च्या फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy S20 चा स्वस्त मॉडेल म्हणजे Galaxy S20 FE बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. हा फोन Galaxy S20 Fan Edition नावाने येईल. आता Samsung Philippines वेबसाइट वर फोनच्या अधिकृत लॉन्चच्या आधी Galaxy S20 FE लिस्ट झाला आहे. वेबसाइट वर डिवाइसचे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे, ज्यात डिवाइसची इमेज, कलर ऑप्शन आणि स्टोरेजची माहिती देण्यात आली आहे. Samsung Galaxy S20 FE प्रोडक्ट पेज मध्ये फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला नाही.

कंपनीच्या अधिकृत साइट वर प्रोडक्ट पेज बनल्यानंतर आशा आहे कि Samsung लवकरच Philippines मध्ये हा हँडसेट लॉन्च करू शकते. लॉन्चच्या आधीच फोनचे स्पेसिफिकेशन्स लीकच्या माध्यमातून समोर आले आहेत. कंपनीच्या साइटनुसार Samsung Galaxy S20 FE Cloud Navy आणि Cloud Lavender कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल.

हे देखील वाचा: 5,000एमएएच बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यांसह लॉन्च झाला Samsung चा पावरफुल फोन Galaxy A42 5G

प्रोडक्ट पेज वर हा फोन 128GB स्टोरेज सह दिसला आहे. तसेच फोन डुअल सिम कार्ड सपोर्ट सह येईल. वेबसाइट वर समोर आलेल्या फोटोजनुसार डिवाइस मध्ये होल-पंच कटआउट असेल ज्यात सेल्फी कॅमेरा असेल. डिवाइसच्या उजवीकडे आणि डावीकडे कमी बेजल्स असतील. तर बॉटमला चिन पार्ट दिसेल. मागे फोन मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आयताकृती असेल.

स्पेसिफिकेशन्स

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस 20 फॅन एडिशन मध्ये 6.5 इंचाचा सुपर AMOLED पॅनल असू शकतो ज्यात 120Hz रिफ्रेश रेट असेल. फोन बाबत बोलले जात आहेत कि हा Snapdragon 865 चिपसेट आणि 6GB रॅम सह येईल. अलीकडेच समजले आहे कि एफई मॉडेल 4 जी आणि 5 जी दोन वर्जन मध्ये वेगवेगळ्या बाजारांमध्ये उपलब्ध होईल.

हे देखील वाचा: Samsung ची मोठी भेट, पुन्हा कमी केली 5000mAh बॅटरी असलेल्या Galaxy A21s ची किंमत, जाणून घ्या नवीन प्राइस

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल ज्यात OIS सपोर्ट असलेला 12-मेगापिक्सलचा मुख्य शूटर, 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूम असलेला 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा असेल. वीडियो आणि सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला 32-मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. लीकनुसार यात 4500 एमएएच ची बॅटरी असेल जी 15वॉटच्या चार्जरला सपोर्ट करेल. सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफई च्या लॉन्च डेटची माहिती कंपनीने दिली नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here