1 GBPS अल्ट्रा फास्ट स्पीड सह लॉन्च झाली जियो गीगाफाइबर, मिळेल TV फ्री, 5 सप्टेंबर पासून करा बुकिंग

रिलायंस इंडस्ट्रीज ने आज आपल्या ऍन्यूल जनरल मीटिंग मध्ये जियो गीगाफाइबरचा व्यावसायीक लॉन्च केला आहे. इवेंटच्या सुरवातीला कंपनीचे चेयरमैन मुकेश अंबानी यांनी रिलायंस इंडस्ट्रीजच्या कामगिरीबद्दल सांगितले. मुकेश अंबानी यांनी सांगितले कि 2019 मध्ये आरआईएल मोस्ट प्रॉफिटेबल कंपनी ठरली आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले कि मागील आर्थिक वर्षात रिलायंस इंडस्ट्रीज सर्वात जास्त नफा मिळवणारी कंपनी होती.

मुकेश अंबानी यांनी जियो फाइबर अधिकृतपणे सादर केली. मुकेश अंबानी यांनी सांगितले की जियो 5 जी नेटवर्क रेडी आहे. तसेच वायरलेस नेटवर्क 4जी सह येतो जो 5जी मध्ये रूपांतरित केला जाऊ शकतो. त्यांच्यामते जियो होम ब्रॉडबँड सर्विस, इंटरप्राइस सर्विस, ब्रॉडबँड फॉर एसएमई इत्यादी यावर्षी सुरु केले जातील. भविष्यात प्रत्येक घरात अनेक कनेक्टेड डिवाइस असतील.

मुकेश अंबानी म्हणाले कि आगामी काळात 2 अरब आईओटी डिवाइस असतील. जियो गीगाफायबरचे 1.5 कोटी रजिस्ट्रेशन 1600 शहरांत झाले आहेत. सध्या कंपनी 5 लाखा घरांत फायबर ब्रॉडबँडची सेवा देत आहे. एका वर्षात गीगाफाइबर संपूर्ण देशात पोहचेल.

या सुविधा मिळतील

Jio GigaFiber द्वारे देशातील 1100 शहरांत कनेक्टिविटी सुरु केली जाईल. त्याचबरोबर यामुळे यूजर्सना अल्ट्रा एचडी एंटरटेनमेंट, मल्टी पार्टी वीडियो कॉन्फ्रेंसिंग सारख्या सर्विसेज मिळतील. तसेच टीवी सेटअप बॉक्स मध्ये तुम्ही तुमच्या टीवी स्क्रीन वर अल्ट्रा एचडी एंटरटेनमेंटचा लाभ घेता येईल. तसेच लीविंग रूम मध्ये अनेक लोकांशी वीडियो कॉन्फ्रेंसिंग करता येईल, ज्याचा लाइव डेमो मीटिंग मध्ये देण्यात आला. यात तुम्हाला वॉयस एक्टिवेटेड वर्चुअल असिस्टेंट मिळेल जो तुमच्या आज्ञा पाळेल.

जियो फाइबर मध्ये मिळतील पाच सुविधा-

होम सर्विलांस

होम ऑटोमेशन

लँडलाईन

डीटीएच

ब्रॉडबँड

5 सप्टेंबर पासून गीगाफाइबरचे कमर्शियल लॉन्च

मुकेश अंबानी यांनी सांगितले कि 5 सप्टेंबरला जियो फाइबर कमर्शियल लॉन्च होईल. या अंतगर्त 100mbps पासून 1gbps चे चार प्लान असतील. तर जियो फाइबर प्लानची सुरवात 700 रुपयांपासून होईल जे 10,000 रुपयांपर्यंत जातील. पण ग्राहकांना फक्त एका सिवर्स साठी पैसे द्यावे लागतील कारण वॉयस कॉल प्रत्येक प्लान मध्ये फ्री मिळतील. तसेच यूएस/कॅनडा साठी 500 रुपयांचा प्लान सादर करण्यात आला आहे, ज्यात अनलिमिटेड फ्री वॉयस कॉल मिळतील.

मोफत मिळेल टीवी

मुकेश अंबानी यांनी जियो फाइबर वेलकम ऑफर सादर केली. या ऑफर मध्ये ग्राहकांना HD/4K टेलीविजन सेट आणि 4k सेट-अप बॉक्स मिळेल. तसेच मुकेश अंबानी म्हणाले कि आता जियो गीगाफाइबर वर नवीन चित्रपट प्रदर्शित होतील. म्हणजे, यूजर्स फर्स्ट डे फर्स्ट शो बघू शकतील. यासाठी कोणता प्लान घ्यावा लागेल याची माहिती देण्यात आली नाही. या ऑफरच्या अधिकृत माहितीसाठी इथे क्लिक करा

Jio IoT प्लॅटफॉर्म

1 जानेवारी 2020 पासून Jio IoT प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल. कंपनीचे ध्येय 1 अरब घरांना Jio IoT शी जोडण्याचा आहे. तसेच कंपनी सर्व केबल ऑपरेटर्स सोबत पार्टनरशिप करण्याचा विचार करत आहे.

AGM मध्ये रिलायंस इंडस्ट्रीजचे चेयरमेन मुकेश अंबानी म्हणाले कि आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साल 2020 पर्यंत 5 लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. ते म्हणाले कि “340 मिलियन यूजर बेस सह कंपनी भारतातील नंबर एक मोबाईल सेवा देणारी कंपनी बनली आहे.” त्याचबरोबर त्यानी अशी पण माहिती दिली आहे कि “यूजर बेस व्यतिरिक्त रेवेन्यू च्या बाबतीत पण कंपनी नंबर एक बनली आहे. 1,30,000 कोटी रेवेन्यू जियोचा होता जो कि एक रेकॉर्ड आहे.”

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here