Samsung Galaxy S23 च्या लाँच डेटची कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे. यंदाचा Unpacked event येत्या 1 फेब्रुवारीला आयोजित केला जाईल, अशी माहिती दक्षिण कोरियन टेक जायंटनं आपल्या अधिकृत वेबसाइटवरून दिली आहे. हा इव्हेंट अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोमध्ये आयोजित केला जाईल, जो भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता सुरु होईल. या इव्हेंटमधून कंपनी नव्या Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra मॉडेल्ससह नव्या स्मार्टवॉच आणि टीडब्लूएस एअरबड्स देखील सादर करू शकते.
Samsung Unpacked 2023 लाँच होणारे डिवाइस
Unpacked 2023 इव्हेंटमधून 1 फेब्रुवारीला सॅमसंग आपली नवीन Galaxy S series सादर करू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये या सीरिजबद्दल बरीच माहिती समोर आली आहे. लीक रेंडर्समधून आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. तसेच यात Snapdragon 8 Gen 2 चिपसेट, तीन स्क्रीन साइज, 200MP पर्यंतचा कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंग असे स्पेक्स मिळू शकतात. हे देखील वाचा: तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये येईल Samsung Galaxy A14 5G फोन; भारतीय लाँचपूर्वीच किंमत लीक
भारतात येणार का Galaxy S23 series
ग्लोबल लाँचनंतर आपली नवीन एस सीरिज भारतात सादर करण्यासाठी Samsung कधीच जास्त वेळ घेत नाही. गेल्यावर्षीही Galaxy S22 सीरिज ग्लोबल लाँचनंतर एका आठवड्याने भारतात आली होती. यंदाही कंपनीकडून हीच अपेक्षा आहे. 1 फेब्रुवारीला जागतिक बाजारात नवीन फ्लॅगशिप सीरिज आल्यानंतर कंपनी पुढील आठवड्यात म्हणजे 8 फेब्रुवारीला भारतीय लाँच आयोजित केला जाऊ शकतो.
Samsung Galaxy S23 Ultra चे लीक स्पेसिफिकेशन्स
थेट सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन्स पाहायचे झाले तर लिस्टिंगनुसार हा मोबाइल फोन 19.3:9 अॅस्पेक्ट रेशियोसह सादर केला जाऊ शकतो जो 1440 x 3088 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.8 इंचाच्या लार्ज डिस्प्लेला सपोर्ट करू शकतो. फोनची स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. यात 16.7एम कलरचा सपोर्ट देखील मिळू शकतो.
Samsung Galaxy S23 Ultra च्या रॅम व स्टोरेजची माहिती देखील टेनावर मिळाली आहे. सर्टिफिकेशन्स साइटवर हा सॅमसंग फोन 8 जीबी रॅम आणि 12 जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे. तर स्टोरेज पाहता टेनावर हा स्मार्टफोन 256जीबी स्टोरेज, 512जीबी स्टोरेज आणि 1टीबी स्टोरेजसह लिस्ट झाला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर असल्याचा खुलासा टेनावर झाला आहे. इथे स्मार्टफोनमध्ये 3.36GHz, 2.8GHz आणि 2.0GHz क्लॉक स्पीड असलेला कोर असल्याचं सांगण्यात आला आहे. जीपीयू डिटेल्स पाहता Galaxy S23 Ultra क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो.
फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्राच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये 200 मेगापिक्सल आणि 108 मेगापिक्सल लेन्स मिळू शकते. तसेच मागे 12 मेगापिक्सल + 12 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर दिले जाऊ शकतात. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: पोकोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन येतोय भारतात; X5 Pro नंतर आता आली POCO C55 ची बातमी
Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोन 4,885एमएएच बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. टेनावर या फोनचे डायमेंशन 163.4 x 78.1 x 8.9एमएम आणि वजन 233ग्राम दाखवण्यात आलं आहे. सर्टिफिकेशनमध्ये हा सॅमसंग स्मार्टफोन SM-S9180 मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे ज्याची माहिती आम्हाला जीएसएम एरिना वेबसाइटच्या माध्यमातून मिळाली आहे.