Exclusive : Samsung घेऊन येत आहे खूप स्वस्त फोन Galaxy A5, Xiaomi Redmi 8A च्या अडचणीत वाढ

Samsung ने अलीकडेच भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘गॅलेक्सी ए’ सीरीज अंतर्गत Galaxy A50s, Galaxy A30s आणि Galaxy A10s स्मार्टफोन लॉन्च केले होते. 91मोबाईल्स ने अलीकडेच एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि कंपनी लवकरच Galaxy A20s स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही Galaxy A20s चे वेरिएंट्स आणि त्याच्या त्यांच्या किंमतींचा खुलासा केला होता. आज पुन्हा आम्ही Samsung संबंधित एक्सक्लूसिव बातमी घेऊन आलो आहोत ज्यात समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी ए सीरीजचा अजून एक खूप स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

91मोबाईल्सला विश्वासू सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कि Samsung भारतात आपल्या गॅलेक्सी ए सीरीज अंतर्गत अजून एक आणि स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे जो एंट्री लेवल फोन असेल. हा स्मार्टफोन SM-A015F मॉडेल नंबर सह बाजारात येईल तसेच हा मोबाईल Galaxy A5 नावाने विकला जाऊ शकतो. Samsung Galaxy A5 कंपनी लो बजेट सेग्मेंट मध्ये आणू शकते ज्याची किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.

Samsung Galaxy A5 संबंधित माहितीनुसार हा स्मार्टफोन 5.7 इंचाच्या बेजल लेस इनफिनिटी डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल, ज्यात ‘यू’ किंवा ‘वी’ शेप नॉच मिळू शकते. सॅमसंगच्या या आगामी स्मार्टफोन मध्ये 16 जीबी इंटरनल स्टोरेज असेल. हा डिवाईस एंडरॉयड 9 पाई वर सादर केला जाईल जो सॅमसंगच्या वन यूआई सह येईल. Samsung Galaxy A5 च्या लॉन्च आणि याच्या स्पेसिफिकेशन्स संबंधित इतर माहिती पण लवकरच तुम्हाला दिली जाईल. या फोन बद्दल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही कि Galaxy A5 आल्याने कालच लॉन्च झालेल्या Xiaomi Redmi 8A ला चांगली टक्कर मिळणार आहे.

Samsung Galaxy M10s

सॅमसंगचा हा फोन 27 ऑगस्टला भारतीय बाजारात आला होता जो दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला होता. Samsung Galaxy A10s चा 2 जीबी रॅम + 32 जीबी मेमरी वेरिएंट 9,499 रुपये तर 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन फोन ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy A10s मध्ये 6.2-इंचाचा एचडी+ टीएफटी इफिनिटी-वी डिस्प्ले देण्यात आला आहे. एंडरॉयड 9 पाई सह 2.0 गीगाहर्ट्ज ऑक्टा-कोर प्रोसेसर व एक्सनॉस चिपसेट वर हा फोन चालतो. फोटोग्राफी साठी Galaxy A10s मध्ये 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Samsung Galaxy A10s मध्ये 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here