जियो ने केली स्क्रीन्ज सोबत भागीदारी, बनली भारतातील सर्वात मोठा इंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म

भारतातील प्रमुख मोबाईल सेवा देणारी कंपनी रिलायंस जियो ने लॉन्च झाल्या पासून यूजर्स एंगेजमेंट वर विशेष लक्ष दिले आहे. कंपनी ने सर्वात आधी कॉलिंग फ्री करून सर्वांना धक्का दिला आणि नंतर लोकांना मोबाईल वर भरपुर इंटरटेनमेंट देण्याचे प्रयत्न केले. काही दिवसांपूर्वी कंपनी ने जियो यूजर्स साठी आईपीएल चालू असताना क्रिकेट प्ले अलॉन्ग ची सुरवात केली होती. त्याचबरोबर कंपनी बिना सब्सक्रिप्शन आईपीएल क्रिकेट ची लाइव स्ट्रीम पण देत आहे. या सर्व प्रयत्नांचे यूजर्सनी पण कौतुक केले आहे आणि आता कंपनी ने इंटरटेनमेंट बेस्ट कंपनी स्क्रीन्ज सोबत समझोता केला आहे. स्क्रीन्ज ब्रॉडकास्ट आणि इंटरटेनमेंट मधील मोठी कंपनी आहे जी जगातील प्रमुख ब्राडकॉस्टर्स वापरतात.

या भागेदारी नंतर जियो भारतातील सर्वात मोठा इंटरनेटमेंट प्लॅटफॉर्म बनेल. काही दिवसांपूर्वी कंपनी ने आॅडियो वीडियो साठी सावन सोबत हात मिळवणी केली होती. तसेच या भागीदारी नंतर जियो चा गेमिंग प्लॅटफॉर्म मजबूत होईल. कंपनी चा दावा आहे की सध्या जियो क्रिकेट प्ले अलॉन्ग साढे सहा कोटी पेक्षा लोक खेळतात. स्क्रीन्ज भारतात एंटरटेनमेंट बेस्‍ड गेमिंग चा पहिला प्लॅटफॉर्म ठरला आहे जिथे ब्रॉडकास्टर्स आणि पब्लिशर्स चांगले एंगेजिंग गेम तयार करू शकतील. जियो च्या 4जी प्लॅटफॉर्म वर यूजर्स लाइव गेम, रीयल-टाइम इंटरेक्शन इत्यादि चा लाभ घेऊ शकतील.

कंपनी ने या भागेदारी सोबत जियो स्क्रीन्ज प्लॅटफॉर्म ची वैशिष्टे सांगितली आहेत ज्यात सांगण्यात आले आहे की या प्लॅटफॉर्म वर टीवी शो चालू असताना ब्रॉडकास्टर आणि दर्शकांमध्ये टू वे कम्यूनिकेशन ची सुविधा मिळते. तसेच रियल टाइम शो चालू असताना हा वोटिंग ची सुविधा पण देतो. कंपनी ने माहिती दिली आहे की हा कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम ला अजून सोप्पे बनवतो ज्यामुळे ब्रॉडकास्टर्स इंटरॅक्टिव कंटेंट ला अजून चांगले बनवू शकतील.

विषेश म्हणजे जियो स्क्रीन्ज प्लॅटफॉर्म एंडरॉयड, आईओएस आणि जियो काई-ओएस वर चालेल. तसेच वेगवेगळ्या सोशल नेटवर्क प्लॅटफार्म गूगल, फेसबुक आणि ट्विटर ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर यूजर्स नुसार वेगळे प्रोफाइल बनवतो ज्यामुळे विशेष जाहिरात दाखवता येते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here