Reliance Jio ने सप्टेंबर मध्ये जोडले 69 लाख ग्राहक, अशी आहे इतर कंपन्यांची कामगिरी

भारतीय टेलिकॉम सेक्टर मध्ये आल्यानंतर Reliance Jio सतत पुढे जात आहे. याचा अंदाज लावता येतो प्रत्येक महिन्याला कंपनीशी जोडल्या जाणाऱ्या यूजर्स वरून. आता रिपोर्ट समोर आला आहे कि जियो ने सप्टेंबर मध्ये पण सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना मागे टाकत सर्वात जास्त सब्सक्राइबर्स जोडले आहेत.

जियो व्यतिरिक्त दुसऱ्या कंपन्यांच्या सब्सक्राइबर्सची संख्या कमी होती. रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि Jio ने यावर्षी सप्टेंबर मध्ये एकूण 69.93 लाख ग्राहक जोडले आहेत. हा रिपोर्ट ट्राईने जारी केला आहे. जियो व्यतिरिक्त बोलायचे झाले तर Vodafone Idea ला 25.7 लाख सब्सक्राइबर्सचे नुकसान झाले आहे. तर Bharti Airtel ला पण 23.8 लाख ग्राहकांचा तोटा सहन करावा लागला आहे.

नवीन आकड्यांनुसार Jio चा सब्सक्राइबर्स बेस 35.52 कोटी आहे. सरकारी टेलिकॉम कपंनी MTNL ला पण सप्टेंबर मध्ये 8,717 यूजर्सचे नुकसान झाले आहे. जियो व्यतिरिक्त अजून एक कंपनी आहे, जिचा सब्सक्राइबर्स बेस वाढला आहे आणि ती BSNL आहे. बीएसएनएल ने सप्टेंबर मध्ये 7.37 नवीन ग्राहक जोडले आहेत.

अलीकडेच वोडाफोन-आइडिया आणि एयरटेल ने घोषणा केली होती कि ते 1 डिसेंबर पासून आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवणार आहेत. या घोषणेनंतर रिलायंस जियोने आपल्या एका विधानात म्हटले कि पुढल्या काही आठवड्यात जियोचे टॅरिफ प्लान महाग होतील, पण कंपनीने नवीन किंमतींची माहिती दिली नाही. टेलिकॉम क्षेत्रात सतत होत असलेल्या तोट्यामुळे जियो ने काही दिवसांपूर्वी दुसऱ्या नेटवर्क्स वर कॉलिंग साठी वेगळे आईयूसी वाउचर सादर केले होते. आता कंपनी टॅरिफ महाग करणार आहे. यूजर्स वर अशाप्रकारे डबल मार पडणार आहे.

रिपोर्टनुुसार रिलायंस जियोच्या सब्सक्राइबरची संख्या वाढत आहे. पण कंपनीला सतत नुकसान पण होत आहे. इतकेच नव्हे तर मार्केट मध्ये परफॉर्मेंस दाखवणाऱ्या एवरेज रेवन्यू पर कस्टमर (ARPU) च्या बाबतीत जियो वोडाफोन आइडिया आणि भारती एयरटेल पेक्षा मागे आहे. वोडाफोन-आइडिया आणि एयरटेल ने टॅरिफ वाढवण्यासाठी सरकार द्वारे घेतल्या जाणाऱ्या AGR चे कारण दिले आहे. वोडाफोन आइडिया आणि एयरटेल ला जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने वोडाफोन आइडियाला समायोजित सकल महसूल (एजीआर) च्या रूपात 44,200 कोटी रुपये समायोजित सकल महसूल (एजीआर) 90 दिवसात देण्यास सांगितले होते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here