जगातील पहिला 60x Super Zoom आणि 64MP सेंसर असलेला स्मार्टफोन Vivo X30 येणार आहे बाजारात, बदलेले कॅमेऱ्यांची व्याख्या

Vivo कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे कि वीवो पुढल्या महिन्यात टेक बाजारात आपला नवीन डिवाईस आणणार आहे, ज्याचे नाव Vivo X30 असेल. कंपनीने Vivo X30 चा टीजर जारी केला आहे ज्यात फोनचा बॅक पॅनल दाखवण्यात आला होता. या टीजर मधून फोनच्या डिजाईन संबंधित महत्वाची माहिती मिळाली होती. आज पुन्हा वीवो ने Vivo X30 चा नवीन वीडियो शेयर केला आहे. हा वीडियो समोर आल्यामुळे हा खुलासा झाला आहे कि Vivo X30 कंपनी द्वारा 60x Super Zoom सह बाजारात येईल. या वीडियो टीजरने स्पष्ट केले आहे कि Vivo X30 खास कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल.

60x Super Zoom

सर्वात आधी फोनच्या झूमिंग क्षमतेबद्दल बोलायचे तर कंपनीच्या वीडियो मध्ये फोन हवेत उडणाऱ्या विमानाचा फोटो घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या वीडियो मध्ये फोन हळहळू झूम केला जातो जो 1x झूम वरून 60x झूम वर जाऊन थांबतो आणि मग विमानाचा फोटो क्लिक करतो. या विमानाच्या खाली 60x Super Zoom लिहिण्यात आले आहे सोबत Vivo X30 व 5G आहे.

कॅमेरा डिटेल

Vivo X30 मध्ये 60x Super Zoom क्षमता असलेल्या लेंस सोबतच याचे इतर कॅमेरा डिटेल पण कंपनीने टीज केले आहेत. Vivo च्या वीडियो मध्ये एक व्यक्ति कॅमेरा लेंस साफ करताना दाखवण्यात आला आहे. वीडियो मध्ये दाखवण्यात आलेल्या एका कॅमेरा लेंस वर 16mm ते 123mm ची फोकल लेंथ रेंज लिहिलेली आहे. त्याचबरोबर एफ/1.8 अपर्चर ते एफ/3.0 अपर्चर पर्यंतची क्षमता पण कॅमेरा लेंस वर लिहिण्यात आली आहे. तसेच वीडियो वरून समजले आहे कि Vivo X30 च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये टेलीफोटो लेंस आणि एक पेरिस्कोप पण असेल.

Vivo X30

वीवोच्या या आगामी स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर Vivo X30 कंपनी डुअल मोड 5G सपोर्ट सह लॉन्च करेल. Vivo X30 बद्दल असे पण कंफर्म झाले आहे कि प्रोसेसिंग साठी या स्मार्टफोन मध्ये सॅमसंगचा एक्सनॉस 980 चिपसेट दिला जाईल आणि याच चिपसेट मध्ये 5जी क्नेक्टिविटीची क्षमता असेल. लीक्स नुसार Vivo X30 मध्ये 6.5 इंचाचा एमोलेड डिस्प्ले दिला जाईल जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट सह येईल.

Vivo X30 क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता समोर आलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल. तसेच Vivo X30 मध्ये 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर आणि एक 2 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर मिळेल. तसेच फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

विशेष म्हणजे Vivo X30 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स आताच लीक मध्ये समोर आले आहेत, त्यामुळे 64MP कॅमेरा आहे असे ठामपणे आम्ही म्हणू शकत नाही. पण जर Vivo X30 मध्ये प्राइमरी सेंसर 64 मेगापिक्सलचा असला तर हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो 64MP + 60x Super Zoom सह येईल.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here