Xiaomi घेऊन येणार आहे 5जी स्मार्टफोन, येईल 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह

काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन बाजारात Samsung आणि Huawei सारख्या कंपन्यांनी 5जी कनेक्टिविटी असलेले फोन सादर केले आहेत. आता या शर्यतीत सामील होत शाओमीने पण कंबर कसली आहे. कंपनी Redmi K30 5G व्यतिरिक्त 5जी नेटवर्क वर चालणारे अनेक स्मार्टफोन सादर करू शकते. याचा एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यात शाओमीच्या 5जी डिवाइसेजना चीन मध्ये 3सी सर्टिफिकेशन मिळाल्याची माहिती आहे.

3C सर्टिफिकेशन नुसार शओमी फोन्स M2001J1E आणि M2001J1C मॉडेल नंबर सह दिसले आहेत. हे फोन्स 5जी कनेक्टिविटी सह सादर केले जातील. तसेच दोन्ही फोन फास्ट चार्जिंग फीचरला सपोर्ट पण करतील. विशेष म्हणजे कंपनी 10 डिसेंबरला रेडमी के30 5जी फोन लॉन्च करणार आहे.

सूत्रांनुसार कंपनी नवीन वर्षात 5जी कनेक्टिविटी असलेले मोबाईल्स ग्लोबल मार्केट मध्ये सादर करण्याची योजना बनवत आहे. रिपोर्टनुसार शाओमीचे हे स्मार्टफोन 3सी च्या डेटाबेस वर दिसले आहेत. यात समजले आहे कि फोन 66 वॉट फास्ट चार्जिंग फीचर सह येईल.

काही दिवसांपूवी शाओमीने 100W सुपर चार्ज टर्बो चार्जिंग टेक्नोलॉजी सादर केली होती, त्यावेळी कंपनीने दावा केला होता कि या टेक्नॉलॉजी द्वारे 4,000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. तर Vivo च्या 120W charging technology पाहता हि शाओमीपेक्षा काही पाऊले पुढे आहे आणि 4000एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन फक्त 13 मिनिटांत फुल चार्ज करते.

Xiaomi ने 100W Super Charge Turbo charging technology टेक विश्वासमोर ठेवताना हि टेक्नोलॉजी कोणत्या कॅटेगरीत आणि कोणत्या बजेट रेंजच्या स्मार्टफोन्सना सपोर्ट करेल याची माहिती दिली नाही. पण रिपोर्ट्स मध्ये असे समोर आले आहे कि हि टेक्नॉलॉजी असलेले Xiaomi स्मार्टफोन पुढच्यावर्षी म्हणजे 2020 च्या सुरवातीला किंवा मध्यात बाजारात येतील.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here