फोन वापरताना लागला शॉक, 28 वर्षीय तरुणाचा झाला अंथरुणातच मृत्यू

गेल्या महिन्यात एक बातमी समोर आली होती कि ओरिसा मध्ये एक 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू फोन उशाला ठेऊन झोपल्यामुळे झाला होता. मीडिया रिपोर्ट वरून समजले कि मृतकाने आपला मोबाईल चार्ज वर लावून झोपला होता आणि रात्री त्याच्या फोन मध्ये ओवर चार्जिंगमुळे आग लागली आणि तसेच ब्लास्ट झाला आहे. या दुर्घटनेत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला होता. तर आता अशीच हैराण करणारी एक बातमी थाईलँड मधून आली आहे जिथे फोनला करंट लागल्यामुळे एक 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

विदेशी न्यूज वेबसाइट द सन कडून मिळालेल्या या बातमी मध्ये सांगण्यात आले आहे कि थाईलँड मध्ये एका 28 वर्षीय व्यक्तीने फोन चार्जिंगला लावून आपल्या बेड वर ठेवला होता आणि नंतर तो मृत अवस्थेत बेड वर मिळाला. न्यूज रिपोर्ट नुसार 28 वर्षीय कीत्तिसक मूनकीत्तिने आपल्या बेड वरच एक्स्टेंशन बोर्ड मध्ये फोन चार्जिंगला लावला होता आणि तो बेड वर पडून तो वापरत होता. वापरताना त्याला करंट लागला आणि अंथरुणातच तरुणाचा मृत्यू झाला.

कीत्तिसक सोबत घडलेल्या या घटनेची माहिती त्याच्या आईने पोलिसांना दिली. रिपोर्टनुसार त्याच्या आईने पोलिसांना सांगितले आहे कि, ती घरात काम करत होती आणि काम करताना त्यांनी कीत्तिसकला कामात मदत करण्यासाठी आवाज दिला. जेव्हा अनेकदा हाक मारून पण तरुणाने उत्तर दिले नाही तेव्हा कीत्तिसकची आई त्याच्या खोलीत गेली तेव्हा तिने बघितले कि कीत्तिसक आपल्या अंथरुणात झोपलेला आहे आणि त्याच्या शरीरात हालचाल नव्हती.

मुलगा निपश्चित पडलेला पाहून त्याच्या आईने कीत्तिसकला अनेकदा हलवून बघितले तर तो पूर्णपणे बेशुद्ध होता. तेव्हा पोलिसांना कळवण्यात आले आणि जेव्हा पोलीस घटनास्थळी पोचले तेव्हा कीत्तिसकला मृत घोषित करण्यात आले. पोलीस नुसार 28 वर्षीय युवकाच्या शरीरावर फोनची तार गुंडाळलेली होती तसेच कीत्तिसकचे दोन्ही हात आणि मनगटांवर भाजल्याचे निशाण होते. पोलिसांनी प्रथमदृष्ट्या असे मानले कि फोन चार्जिंग वर असल्यामुळे कीत्तिसकला करंट लागला आणि करंट लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी मृत शरीर पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आले आहे.

एका महिन्यात हि दुसरी दुर्घटना आहे ज्यात दुर्लक्षामुळे मोबाईल यूजरला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आम्ही ग्राहकांना सावधानतेचा इशारा देत आहोत कि टेक्नॉलॉजीला वापर करताना हिशोबात करावा व्यसन लागू नये. 91मोबाईल्स आपल्या वाचकांना विनंती करत आहोत कि रात्री झोपताना फोन चार्जिंग वरून काढून स्वतःपासून दूर ठेऊन झोपा आणि कधीही फोन ओवर चार्ज करू नका. करंट, आग किंवा ब्लास्टच नाही तर मोबाईल मधून होणारा किरणोत्सर्ग मानवी शरीरासाठी घातक असतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here