जगातील पहिला Snapdragon 4 Gen 1 चिप असलेल्या फोन; बजेटमध्ये मिळणार जबरदस्त परफॉर्मन्स

iqoo z6 lite 5g price in india leaked before 14 september launch

आयकू ब्रँडनं भारतात चांगलं नाव कमवलं आहे, कंपनी सतत नवनवीन फीचर्स बजेटमध्ये सादर करण्याचे प्रयत्न करत असते. आता असाच एक नवा प्रयत्न कंपनी करणार आहे जो इतर कोणत्याही कंपनीनं केला नाही. आयकू येत्या 14 सप्टेंबरला भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. ‘झेड’ सीरीजमध्ये येणाऱ्या हा मोबाइल iQOO Z6 Lite 5G Phone असेल जो Qualcomm Snapdragon 4 Gen 1 चिपसेटसह लाँच होईल.

14 सप्टेंबरला येणार हा स्मार्टफोन जगातील पहिला फोन असेल ज्यात क्वॉलकॉमचा नवीन चिपसेट देण्यात येईल. Snapdragon 4 Gen 1 चिपसेट बजेट स्मार्टफोन्ससाठी डिजाईन करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी आयकू स्मार्टफोन देखील बजेटमध्ये लाँच केला जाणार आहे. एका ताज्या रिपोर्टमधून आयकू जेड 6 लाइट 5जी फोनच्या भारतीय लाँचच्या आधीच या हँडसेटच्या किंमतीचा खुलासा करण्यात आला आहे. हे देखील वाचा: एका चार्जमध्ये 456km ची जबरदस्त रेंज! आली Mahindra ची पहिली Electric SUV Car XUV 400; 150 kmph चा टॉप स्पीड

iqoo z6 lite 5g price in india leaked before 14 september launch

iQOO Z6 Lite 5G price in India

रिपोर्टनुसार आयकू जेड6 लाइट 5जी दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच होईल. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात येईल, ज्याची प्राइस 13,499 रुपये असेल. तसेच iQOO Z6 Lite 5G च्या 6GB RAM + 128GB Storage मॉडेलची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात येईल. ही अधिकृत किंमत नाही त्यामुळे जोपर्यंत हा फोन लाँच होत नाही तोपर्यंत यावर विश्वास ठेवता येणार नाही.

World’s 1st Snapdragon 4 Gen 1 Phone

आयकू जेड6 लाइट 5जीची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाईल. याआधी कोणत्याही ब्रँडच्या कोणत्याही मोबाइल फोनमध्ये हा चिपसेट देण्यात आला नाही. Snapdragon 4 Gen 1 चिप 6नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला आहे जो जीपीयू परफॉर्मन्स 18.4 टाक्यांनी तर सीपीयू परफॉर्मन्स 6.9 टक्क्यांनी बूस्ट करतो. हा चिपसेट ड्युअल 5जी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.

iqoo z6 lite 5g price in india leaked before 14 september launch

iQOO Z6 Lite 5G Specifications

फोनचेह अन्य स्पेसिफिकेशन्स पाहता हा आयकू मोबाइल 2.5डी फ्लॅट फ्रेम डिजाइनसह बाजारात येईल ज्याची जाडी फक्त 8.25 एमएम आहे. या फोनचा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करेल. लीकनुसार फोनमध्ये 6.58 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळेल. हे देखील वाचा: Airtel 5G Launch: Airtel 5G साठी विकत घ्यावं लागणार का नवीन SIM Card? कंपनीनं दिलं उत्तर

iQOO Z6 Lite 5G ड्युअल रियर कॅमेऱ्यासह बाजारात येईल ज्यात 50MP Eye Auto Focus प्रायमरी सेन्सर दिला जाईल. हा कॅमेरा एआय टेक्नॉलॉजीसह येईल. तसेच पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाईल जी 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here