Samsung Galaxy S10 Lite भारतात लवकरच होईल लॉन्च, स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सह फ्लिपकार्ट वर झाला लिस्ट

Samsung ने गेल्या आठवड्यात 4 जानेवारीला ग्लोबल मंचावर आपला लेटेस्ट स्मार्टफोन गॅलेक्सी एस10 लाइट सादर केला होता. आता Samsung Galaxy S10 Lite ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि सॅमसंग इंडिया वर लिस्ट केला गेला आहे. त्यामुळे असे बोलता येईल कि हा फोन लवकरच भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. या लिस्टिंग मध्ये लॉन्च डेट आणि किंमतीचा खुलासा झाला नाही.

हा डिवाइस भारतात लेटेस्ट प्रोसेसर, दमदार कॅमेरा आणि एचडी डिस्प्ले सपोर्ट सह सादर केला जाईल. फ्लिपकार्ट लिस्टिंग मध्ये फोनचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. सॅमसंगने आता पर्यंत ग्लोबल लेवल वर पण या फोनच्या किंमतीचा खुलासा केला नाही.

असे बोलले जात आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइटच्या किंमतीची माहिती 7-10 जानेवारी दरम्यान लास वेगास मध्ये होणाऱ्या कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक शो CES 2020 मध्ये दिली जाईल. काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी एस10 लाइट दोन वेरियंट मध्ये सादर केला गेला होता. यात 6GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटचा समावेश आहे. Galaxy S10 Lite व्हाइट, प्रिज्म ब्लॅक आणि प्रिज्म ब्लू कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला गेला होता. त्यामुळे भारतात पण या कलर ऑप्शन सह हा सादर केला जाईल.

Samsung Galaxy S10 Lite चे स्पेसिफिकेशन्स

या फोन मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिजोल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. डिस्प्ले इनफिनिटी ओ सुपर एमोलेड आहे. तसेच फ्लिपकार्ट वर समोर आले आहे कि फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर दिला जाईल. याचा क्लॉक स्पीड 2.8 गीगाहर्ट्ज आहे.

फोटोग्राफी पाहता सॅमसंग गॅलेक्सी एस10 लाइट मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आहे ज्यात 48 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आहे आणि याचा अपर्चर f/2.0 आहे. त्याचबरोबर शानदार वीडियोग्राफीसाठी सुपर स्टेडी ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन मिळेल. तर दुसरी लेंस 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड आणि तिसरी लेंस 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फीसाठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. तसेच या फोन मध्ये 4500mAh ची बॅटरी आहे जी सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here