Tecno ने लॉन्च केला स्वस्त Spark Go Plus, कमी किंमतीत देईल Realme टक्कर

हॉंगकॉंग बेस्ड ट्रांसजिशन होल्डिंगच्या सब-ब्रँड टेक्नो बद्दल 91मोबाईल्सने दोन दिवसांपूर्वी एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि कंपनी आपला नवीन फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. त्यानुसार आज कंपनीने आपल्या Tecno Spark Go सीरीज मध्ये नवीन फोन आणला आहे. डिवाइस Tecno Spark Go Plus नावाने सादर केला आहे.

किंमत आणि ऑफर्स

कंपनीने Tecno Spark Go वेकेशन ब्लू आणि हिलियर पर्पल कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. हा डिवाइस फक्त एकाच वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्याची किंमत 6,299 रुपये आहे. तसेच या डिवाइस सह कंपनी ग्राहकांना 799 रुपयांचा ब्लूटूथ ईयरपीस फ्री देईल. इतकेच नव्हे तर ब्लूटूथ सोबत 3 महिन्यांचे गाना प्लस सब्सक्रिप्शन आणि एकवेळ स्क्रीन रिप्लेसमेंटचा ऑप्शन पण मोफत मिळेल.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता या डिवाइस मध्ये 6.52-HD+ ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्क्रीनचा डिस्प्ले (1600*720 पिक्सल) रेजोल्यूशन सह येतो. तसेच यात 89.5% स्क्रीन टू बॉडी रेश्यो देण्यात आला आहे. फोन मध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्डने 128जीबी पर्यंत वाढवता येते.

फोन मध्ये फोटोग्राफीसाठी मागे 8-मेगापिक्सलचा एआई कॅमेरा डुअल फ्लॅश (F/2.0) सह देण्यात आला आहे. फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा (F/2.0) सिंगल फ्लॅश सह देण्यात आला आहे.

टेक्नो स्पार्क गो प्लस मध्ये पावर बॅकअपसाठी 4000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. डिवाइस एंडरॉयड 9 गो वर्जन वर चालेल. एंडरॉयड गो असल्यामुळे हा फोन कमी रॅम व हलक्या प्रोसेसर सह पण स्मूद व लॅग फ्री चालतो. या फोन मध्ये गूगल प्ले स्टोरच्या माध्यमातून सर्व ऍप्सचे ‘गो वर्जन’ डाउनलोड करता येतील. यात यूट्यूब, जीमेल व गूगल मॅप्स तसेच फेसबुक लाइट सारख्या ऍप्सचा समावेश आहे. हे ऍप्स फक्त कमी इंटरनेट वापरत नाहीत तर फोन हँग न करता चालतात.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here