75 रुपयांमध्ये 30 दिवसांची वैधता; BSNL च्या या प्लॅन्समध्ये मिळतो भरपूर डेटा आणि कॉलिंग

यावर्षी ट्रायनं सुनावल्यानंतर सर्व टेलीकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या यादीत 30 दिवसांची वॅलिडिटी (30 Days Recharge) आणि Monthly Recharge जोडेल आहेत. यात लिस्टमध्ये प्रायव्हेट कंपन्यांसह सरकारी कंपनी BSNL (bsnl online recharge plans) चा देखील समावेश आहे. जर तुम्ही 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन शोधत असाल आणि बीएसएनएल वापरत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी आज 5 BSNL Recharge Plan ची माहिती घेऊन आलो आहोत, जे 30 दिवसांच्या वैधतेसह फ्री कॉलिंग आणि डेटा तसेच SMS देतात. BSNL च्या प्लॅन्सची आरंभिक किंमत 100 रुपयांपेक्षा देखील कमी आहे. चला जाणून घेऊया बीएसएनएलच्या स्वस्त आणि 30 दिवसांची वॅलिडिटी असलेल्या प्लॅन्सची माहिती.

BSNL 30 Days Recharge Plan

  • BSNL STV Rs 75 Plan
  • BSNL STV Rs 147 Plan
  • BSNL STV Rs 247 Plan
  • BSNL STV Rs 299 Plan
  • BSNL STV RS 398 Plan

BSNL चा 75 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या प्लॅनसह तुम्हाला 30 दिवसांची वैधते मिळते. एवढ्या वैधतेसह येणारा हा कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. ज्यात यात युजर्सना डेटा, कॉलिंग आणि अन्य बेनिफिट्स दिले जात आहे. प्लॅनमध्ये 30 दिवसांसाठी व्हॉइस कॉलिंगसाठी 200 मिनट दिले जातात, हे मिनिट्स तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी वापरू शकता. तसेच 2 जीबी डेटा दिला जातो, जो तुम्ही एकाच दिवशी किंवा संपूर्ण तीस दिवस वापरू शकता. इतकेच नव्हे तर या प्लॅनमध्ये या फायद्यांव्यतिरिक्त फ्री कॉलरट्यून्स देखील मिळते.

BSNL चा 147 रुपयांचा प्लॅन

BSNL च्याके 147 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर यात 250 मिनिट्स फेयर यूसेज पॉलिसी (FUP) लिमिटसह अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी व्हॉइस कॉल मिळतात. तसेच युजर्सना 10 जीबी हाय-स्पीड डेटा आणि BSNL ट्यूनची सर्व्हिस देखील मिळते. सरकारी कंपनीचा हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो.

BSNL चा 247 रुपयांचा प्लॅन

247 रुपयांचा हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉइस कॉलसह येतो त्यामुळे तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कितीही गप्पा मारू शकता. जर तुम्ही चॅटिंग आणि इंटरनेट सर्फिंगला महत्व देत असाल तर यात 50GB हाय-स्पीड डेटा देखील दिला जात आहे. तसेच 100 एसएमएस/दिवस आणि बीएसएनएल ट्यून्स आणि इरोज नाउचे मोफत सब्सस्क्रिप्शन दिलं जात आहे.

BSNL चा 299 रुपयांचा प्लॅन

युजर्सना STV_299 मध्ये 30 दिवसांसाठी रोज 3जीबी डेटा मिळत आहे. अशाप्रकारे ग्राहकांना एकूण 90जीबी डेटा दिला जात आहे. परंतु यावरच फायदे थांबत नाहीत, या प्लॅनमध्ये 100 फ्री एसएमएस आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देखील दिली जात आहे.

BSNL चा 398 रुपयांचा प्लॅन

BSNL च्या 398 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सना 30 दिवसांची वॅलिडिटी मिळते. या प्लॅनमध्ये युजर्सना अनलिमटेड डेटा कोणत्याही स्पीड लिमिटविना वापरता येतो. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉल देखील करता येतात. रोज तुम्ही 100 फ्री SMS पाठवू शकता.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here