साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंगने आपला Galaxy XCover Pro rugged स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा डिवाइस फिनलँड मध्ये सादर केला गेला आहे जो जुन्या वर्जन प्रमाणे Rugged आहे. डिवाइस मध्ये डुअल रियर कॅमेरा आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट काही अट्रॅक्टीव्ह फीचर्स आहेत.
Galaxy XCover Pro फक्त ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये येतो. किंमतीबद्दल बोलायचे तर ती 499 यूरो (जवळपास 31,800 रुपये) असेल. या डिवाइसचा सेल 31 जानेवारीला होईल. अजूनतरी या डिवाइसच्या उप्लब्धतेबद्दल माहिती मिळाली नाही.
Samsung Galaxy XCover Pro चे स्पेसिफिकेशन्स
Galaxy XCover Pro पाहता यात TFT पॅनल 6.3-इंचाचा पंच होल-डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिवाइस मधील डिस्प्लेला 1080 x 2400 पिक्सलचा सपोर्ट आहे. तसेच फोन मध्ये Exynos 9611 चिपसेट आणि 4 GB रॅम व्यतिरिक्त फोन मध्ये 64 GB स्टोरेज देण्यात आली आहे.
डिवाइस मध्ये फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 GB पर्यंत वाढवता येईल. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,050mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 15 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
तसेच फोनच्य मागे डुअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 25-मेगापिक्सल प्राइमरी शूटर आणि 8-मेगापिक्सल अल्ट्रावाइड लेंस आहे. फोन मध्ये फ्रंटला 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. डिवाइस एंडरॉयड 9 Pie ओएस वर चालतो जो कंपनीच्या One UI कस्टम स्किन वर आधारित आहे.














