OPPO A3 Pro भारतात लाँचसाठी होत आहे तयार, फोन झाला BIS साईटवर लिस्ट

ओप्पो भारतीय बाजारात ए-सीरिजचा नवीन स्मार्टफोन OPPO A3 Pro लाँच करू शकतो. तसेच हा तोच डिव्हाईस आहे जो चीनमध्ये काही आठवड्यापूर्वी सादर झाला आहे. तसेच, आता भारताच्या ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड वेबसाईटवर स्पॉट करण्यात आले आहे. ज्यामुळे याची भारतात येण्याची शक्यता वाढली आहे. चला, पुढे ताज्या BIS लिस्टिंगला सविस्तर जाणून घेऊया.

OPPO A3 Pro बीआयएस लिस्टिंग

  • ओप्पोचा नवीन मोबाईल CPH2667 मॉडेल नंबरसह बीआयएस सर्टिफिकेशन वेबसाइटवर स्पॉट करण्यात आला आहे.
  • ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड प्लॅटफॉर्मवर फक्त डिव्हाईसचा मॉडेल नंबर दिसला आहे. तर फोनचा मॉडेल नंबर आणि नाव इतर लिस्टिंगमध्ये समोर आले होते.
  • तसेच BIS मध्ये OPPO A3 Pro मोबाईलच्या कोणत्या स्पेसिफिकेशनची माहिती नाही, परंतु याचा भारतात लवकर लाँचचा इशारा मानला जात आहे.

OPPO A3 Pro चे स्पेसिफिकेशन (चीन)

  • डिस्प्ले: OPPO A3 Pro फोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ OLED कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. यावर 2412 x 1080 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये स्क्रीन सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
  • प्रोसेसर: मोबाईलमध्ये 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या मीडियाटेक डायमेंसिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसरचा दम आहे. हा 2.6Ghz पर्यंत हाय क्लॉक स्पीड प्रदान करतो. तसेच, ग्राफिक्ससाठी माली जी 68 जीपीयू आहे.
  • स्टोरेज: हा मोबाईल तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. ज्यात 8 जीबी रॅम+ 256 जीबी स्टोरेज, 12 जीबी रॅम +256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम +512 जीबी इंटरनल स्टोरेजचा समावेश आहे. तसेच यात 12 जीबी पर्यंत वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी पण आहे.
  • कॅमेरा: हा नवीन मोबाईल ड्युअल रिअर कॅमेरासह आहे. यात एफ/1.7 अपर्चरसह 64 मेगापिक्सल प्रायमरी लेन्स आणि 2 मेगापिक्सल इतर लेन्स लावली आहे. तसेच, सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
  • बॅटरी: OPPO A3 Pro 5G फोनमध्ये 5,000 एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. याला लवकर चार्ज करण्यासाठी 67 वॉट फास्ट चार्जिंग मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here