6 जीबी रॅम, 4230एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह OPPO A31 भारतात लॉन्च

OPPO ने काही दिवसांपूर्वी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘ए सीरीज’ वाढवत नवीन डिवाईस OPPO A31 सादर केला होता. आर्कषक लुक आणि शानदार स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन आज कंपनीने भारतीय बाजारात पण ऑफिशियल केला आहे. OPPO च्या आधिकारिक वेबसाइट वर ओपो ए31 चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे जिथे फोनच्या सर्व डिटेल्सचा खुलासा झाला आहे. कंपनीने OPPO A31 ऑफिशियल तर केला आहे पण अजूनही या फोनची किंमत सांगितली नाही. आशा आहे कि येत्या काही दिवसांत या स्मार्टफोनची किंमत पण समोर येईल.

OPPO A31

ओपो ए31 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला चिन पार्ट आहे. ओपो ए31 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या मोठ्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्टेड आहे. OPPO A31 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हेलीयो पी35 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये जीई8320 जीपीयू आहे.

OPPO A31 इंडियन मार्केट मध्ये दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम देण्यात आला आहे तसेच दुसरा वेरिएंट 6 जीबी रॅम वर सादर केला गेला आहे. तसेच ओपो ए31 मध्ये स्टोरेज ऑप्शन्स म्हणून 64 जीबी मेमरी आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OPPO A31 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 12 मेगापिक्सलचा प्राइमरी वाइड अँगल लेंस सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी ओपो ए31 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OPPO A31 कंपनीच्या वेबसाइट वर Mystery Black आणि Fantasy White कलर मध्ये लिस्ट केला गेला आहे. सिक्योरिटीसाठी OPPO A31 च्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी OPPO A31 4,230एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. असे जरी असेल तरी हा फोन कोणत्या तारखेला बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि फोनची किंमत किती असेल यासाठी कंपनीच्या पुढील घोषणेची वाट बघितली जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here