Realme सध्या भारतात वेगाने वाढणारा स्मार्टफोन ब्रँड बनला आहे. देशात एक नंबर वरील Xiaomi ला रियलमी कडून टक्कर देण्यात येत आहे. रियलमीने स्मार्टफोन बाजारावर चांगली पकड मिळवली आहे आता कंपनी स्मार्टगॅजेट्सच्या क्षेत्रात हात अजमावू पाहत आहे. मागेच Realme ने भारतात आपला पहिला स्मार्ट फिटनेस बँड सादर केला होता जो 1,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. Realme Band नंतर आता कंपनी नवीन स्मार्टवॉच आणण्याची तयारी पण करत आहे. कंपनीचे सीईओ माधवसेठ यांनी रियलमी स्मार्टवॉचची घोषणा केली.
Realme Watch ची माहिती स्वतः रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी दिली आहे. माधव सेठ यांनी फक्त हे बाब स्पष्ट केली तर कंपनी लवकरच भारतात आपला पहिला स्मार्टवॉच लॉन्च करणार आहे त्याचबरोबर माधव यांनी या Smart Watch चा लुक पण शेयर केला आहे. कालच म्हणजे 25 मार्चला झालेल्या आस्क माधवच्या सेशन मध्ये माधव सेठ यांनी इंटरव्यू मध्ये रियलमी की स्मार्ट वॉच हातात घातला होता. स्मार्ट वॉच मनगटावर बांधून माधव सेठ यांनी आगामी रियलमी वॉचचा लुक समोर ठेवला आहे.
रियलमी स्मार्टवॉच चौकोनी आकाराच्या डॉयलचा आहे. वीडियो मध्ये माधव यांनी ब्लॅक कलरचा स्मार्टवॉच परिधान केला होता. माधव यांनी आगामी Realme SmartWatch ची माहिती दिली नाही पण स्पष्ट केले आहे कि कंपनी या स्मार्टवॉचच्या कमला लागली आहे आणि येत्या काही दिवसांत लवकरच हा इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे या सेशन मध्ये माधव सेठ यांनी Realme 6 Pro स्मार्टफोनचा पर्पल कलर वेरिएंट पण लॉन्च होणार असल्याची माहिती दिली आहे.
Realme TV
रियलमीने आधीच सांगितले आहे कि कंपनी भारतात आपली स्मार्टटीवी पण लॉन्च करेल. Realme ब्रँडच्या पहिल्या स्मार्ट टेलीविजन वर काम करत आहे आणि हि स्मार्ट टीवी यावर्षी दुसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल. Realme TV बाबत माधव म्हणाले कि जगात पहिल्यांदा भारतातच लॉन्च होईल आणि भारतीय यूजर्सना केंद्रस्थानी ठेऊन रियलमी टीवी मध्ये खास कस्टमाइजेशन केले जात आहे. Realme Smart TV एप्रिल पासून जून दरम्यान भारतात लॉन्च होईल. आशा आहे कि Realme Smart TV फक्त कमी किंमतीत येणार नाही तर इंडियन यूजर्सच्या दृष्टीने टीवी मध्ये कंटेंट पण मिळेल.
Realme Band
रियलमीने अलीकडेच भारतात पहिला फिटनेस ट्रॅकर Realme Band लॉन्च केला होता. याची किंमत 1499 रुपये ठ्वली होती. हा डिवाइस 24 तास हेल्थ असिस्टेंटच्या रूपात काम करतो. यात हार्ट रेट मॉनिटर, आइडल अलर्ट आणि वॉटर ड्रिंक रिमाइंडर सारखे फीचर्स मिळतात. कंपनीचा दावा आहे कि जास्त चांगल्या परिणामांसाठी याचा हार्ट रेट मॉनिटर खासकरून भारतीयांच्या दृष्टीने बनवला गेला आहे.















