जगभरात कोरोना वायरसच्या भीतीमुळे अनके मोठ्या मोबाईल कंपन्यांनी आपले ऑनलाइन लॉन्च इवेंट पण कॅन्सल केले आहेत. याच्या विपरीत हुआवई (Huawei) ने आज एक ऑनलाइन इवेंटचे आयोजन करून Huawei P40 सीरीज लॉन्च केली आहे. हि यावर्षातील बहुप्रतीक्षित सीरीज पैकी एक आहे. या सीरीज मध्ये कंपनीने तीन फोन्स सादर केले आहेत, ज्यात Huawei P40, P40 Pro आणि P40 Plus चा समावेश आहे.
या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Huawei P40 5G च्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीबाबत माहिती देणार आहोत. कंपनीने P40 पाच कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. यात Black, Deep Sea Blue, Ice White, Sliver Froast आणि Blush Gold चा समावेश आहे.
दमदार कॅमेरा
हुआवई P40 मध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोन मध्ये 50 मेगापिक्सल RYYB अल्ट्रा विजन वाइड सेंसर, 8 मेगापिक्सलची 3x ऑप्टिकल झूम टेलिफोटो लेंस, 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा एफ 2.2 अपर्चर असलेला कॅमेरा देण्यात आला आहे. फ्रंटला आईआर डेप्थ/जेस्चर कॅमेरा प्रो बोके सेंसर आहे. त्याचप्रमाणे फ्रंटला एंबिएंट व प्रोक्सिमिटी सेंसर आहे.
स्पेसिफिकेशन्स
Huawei P40 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.1-इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले 1080p+ रेजोल्यूशन सह येतो. यात हाई रिफ्रेश रेट 60Hz आहे. प्रो वर्जन प्रमाणे Huawei P40 मध्ये किरिन 990 5G चिपसेट देण्यात आला आहे. 5G मॉडेम व्यतिरिक्त या चिप मध्ये 7nm + EUV प्रोसेसचा लाभ पण मिळतो. 990 4G एक जुन्या 7nm प्रोसेस वर बनवण्यात आला आहे.
फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन 5G कनेक्टिविटी सह येतो. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 3,800 एमएएच ची बॅटरी आहे. हि बॅटरी 22.5W वायर चार्जिंग सपोर्ट सह येते.
किंमत
किंमतीबाबत बोलायचे तर कंपनीने पी40 चा 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज वेरिएंट 799 यूरो (जवळपास 67,149 रुपये) मध्ये सादर केला आहे. डिवाइस 7 एप्रिल 2020 पासून उपलब्ध होईल. हुआवई पी40 सीरीज व्यतिरिक्त कंपनीने Huawei Watch GT 2 आणि GT 2e पण सादर केले आहेत.
















