Samsung च्या चिपसेट सह लॉन्च झाला वीवो चा 8जीबी रॅम असलेला फोन Vivo G1, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

Vivo बद्दल गेल्या महिन्यात बातमी आली होती कि कंपनी Vivo G1 नावाच्या एका नवीन फोन वर काम करत आहे जो सॅमसंगच्या चिपसेट वर लॉन्च केला जाईल. हा फोन चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेना वर लिस्ट झाला होता त्यानंतर काही स्पेसिफिकेशन्स पण समोर आले होते. आज वीवोने आपला हा नवीन डिवाईस समोर ठेवला आहे. कंपनीने Vivo G1 टेक मंचावर सादर केला आहे. हा फोन 8 जीबी रॅम सह सध्या चीनी बाजारात लॉन्च झाला आहे जो आगामी काळात जगातील इतर बाजारांमध्ये येऊ शकतो.

Vivo G1

वीवो जी1 कंपनीने 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.44 इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. कंपनीने फोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच दिली आहे जी ‘यू’ शेप आहे. फोन डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. वीवो जी1 चा हा डिस्प्ले एचडीआर 10 ला सपोर्ट करतो. तसेच सुरक्षासाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे.

Vivo G1 कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह सॅमसंगच्या एक्सनॉस 980 चिपसेट वर चालतो. विशेष म्हणजे सॅमसंगच्या या चिपसेट मध्ये 5जी मॉडेम इंटिग्रेटेड आहे जो वीवो जी1 ला 5जी कनेक्टिविटी देतो. कंपनीने Vivo G1 8 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफीसाठी वीवो जी1 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा कॅमेरा सेटअप रियर पॅनल वर राउंड शेप मध्ये आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि इतर दोन 2 मेगापिक्सलचे सेंसर आहेत. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo G1 डुअल मोड 5जी म्हणजे SA/NSA 5G सोबत 4जी वोएलटीई ला पण सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी वीवो जी1 इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Vivo G1 चीन मध्ये 3498 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 37,500 रुपयांच्या आसपास.

Vivo V19

उद्या वीवो भारतात Vivo V19 स्मार्टफोन लॉन्च करेल. हा फोन कंपनी ऑनलाईन मंचावर लाईव स्ट्रीमिंग च्या माध्यमातून लॉन्च करेल ज्याचे लाईव प्रक्षेपण केले जाईल. वीवोच्या अधिकृत वेबसाइट सोबत कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर Vivo V19 चा लॉन्च लाईव दाखवला जाईल. हा लॉन्च ईवेंट 12 मे दुपारी 12 वाजता सुरु होईल. बोलले जात आहे कि भारतात Vivo V19 ची बेस किंमत 25,000 रुपयांच्या आसपास असू शकते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here