भारतात येत आहे 5020एमएएच बॅटरी असलेला Redmi Note 9, हा आहे जी85 चिपसेट वापरणारा जगातील पहिला फोन

Xiaomi ने गेल्याच आठवड्यात टेक बाजारात आपल्या क्षमतेचे प्रदर्शन करत नवीन स्मार्टफोन Redmi Note 9 सादर केला होता. ‘रेडमी नोट’ सीरीज मध्ये अगदी नवीन डिवायस आहे जो सध्या फक्त पाश्चिमात्य देशांमध्ये लॉन्च झाला आहे. रेडमी नोट 9 ची सर्वात मोठी खासियत आहे कि हा जगातील पहिला मीडियाटेक जी85 चिपसेट वर चालणारा स्मार्टफोन आहे. Redmi Note 9 च्या इंटरनेशनल लॉन्च नंतर भारतीय फॅन या डिवायसची वाट बघत होते आता या फॅन्ससाठी खुशखबर समोर आली आहे कि रेडमी नोट 9 शाओमीच्या इंडियन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे आणि आता लवकरच लॉन्च होणार आहे.

Redmi Note 9 शाओमी इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वर लिस्ट केला गेला आहे. रेडमी नोट 9 शाओमी इंडिया वेबसाइटच्या आरएफ एक्सपॉजर सेक्शन मध्ये आला आहे. या लिस्टिंग वरून स्पष्ट झाले आहे कि रेडमी नोट 9 भारतीय बाजारात नक्की लॉन्च होईल. पण फोनच्या लॉन्च तारीख काय असेल यासाठी कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल. वेबसाइट वर रेडमी नोट 9 चा मॉडेल नंबर M2003J15SI सांगण्यात आला आहे. विशेष म्हणजे Redmi Note 9 व्यतिरिक्त 8 मे ला लॉन्च होणारा Mi 10 स्मार्टफोन पण इथे आहे.

Redmi Note 9

रेडमी नोट 9 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.53 इंचाच्या फुलएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. यूजर्सच्या फायद्यासाठी शाओमीने फोन डिस्प्ले रिडिंग मोड 2.0 आणि सनलाईट मोडने सुसज्ज केला आहे.

Xiaomi ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Redmi Note 9 मध्ये आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी85 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चिपसेट सह आतापर्यंत कोणताही फोन लॉन्च झालेला नाही त्यामुळे Redmi Note 9 जगातील पहिला फोन आहे जो हीलियो जी85 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Redmi Note 9 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच या फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. तसेच हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Xiaomi Redmi Note 9 रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी रेडमी नोट 9 18वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 5020एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोनच्या 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 199 यूएसडी (जवळपास 15,000 रुपये) आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 249 यूएसडी (जवळपास 18,000 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे. असे असले तरीही फोनच्या इंडिया लॉन्च डेटची वाट बघावी लागेल.

शाओमी रेडमी नोट 9 वीडियो

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here