जे शाओमी-रियलमीला झेपलं नाही ते Oukitel नं केलं; अत्यंत स्वस्तात लाँच केला दगडासारखा मजबूत स्मार्टफोन

Oukitel नं आपल्या रगेड स्मार्टफोन WP20 सीरीजमध्ये नवीन फोन Oukitel WP20 Pro लाँच केला आहे. Oukitel WP20 Pro रगेड स्मार्टफोन याआधी आलेल्या Oukitel WP20 चा अपग्रेड व्हेरिएंट आहे. प्रो व्हेरिएंट कंपनीनं अनेक अपग्रेडसह सादर केला आहे. लेटेस्ट Oukitel WP20 Pro रगेड स्मार्टफोन वजनाने हलका, मोठी दमदार बॅटरी आणि मोठ्या डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. Pro व्हर्जन स्मार्टफोन जास्त स्टोरेज आणि दमदार हार्डवेयरसह सादर करण्यात आला आहे.

Oukitel WP20 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Oukitel WP20 Pro स्मार्टफोन कठीण परिस्थितीत वापरण्यासाठी डिजाइन करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन IP68/ 69K रेटिंग आणि लेटेस्ट MIL-STD-810H सर्टिफिकेशनसह येतो, त्यामुळे धूळ आणि पाण्याचा यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. हा फोन 1.5 मीटर उंचीवरून पडल्यावर देखील फुटत नाही. तसेच फोन उच्च तापमान आणि दबावाखाली देखील वापरता येतो. या फोनचं वजन 297 ग्राम आहे. हे देखील वाचा: संपता संपणार नाही या फोनची बॅटरी; 10 हजारांच्या आत 50MP कॅमेरा असलेला फोन लाँच

Oukitel WP20 Pro स्मार्टफोनचे फिचर्स पाहता यात 6300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की ही 550 तासांचा स्टँडबाय, 55 तास कॉलिंग आणि 60 तास प्लेबॅक ऑफर करते. हा फोन पावरबँक प्रमाणे देखील वापरता येतो. Oukitel WP20 Pro स्मार्टफोनमध्ये 20MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5.93-इंचाचा HD+ डिस्प्ले, 18:9 अस्पेक्ट रेश्यो आणि 720x1440p रिजोल्यूशनसह मिळतो. फोनमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर, 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. यात NFC, फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट देखील आहे. हा फोन Android 12OS वर चालतो. हे देखील वाचा: 64MP कॅमेरा, 66W चार्जिंग, 4830mAh बॅटरीसह आला Vivo V25 Pro; Xiaomi-Oppo ची करणार सुट्टी

Oukitel WP20 Pro ची किंमत

Oukitel WP20 Pro स्मार्टफोन ब्लॅक आणि ग्रीन या दोन कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा अलीएक्सप्रेसवरून सध्या डिस्काउंटेड किंमत 109.99 डॉलर (सुमारे 8,736 रुपये) मध्ये विकत घेता येईल. हा डिस्काउंट 26 ऑगस्टपर्यंत मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here