कोरोना वायरसचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर पडला आहे. देशात अनेक काम धंदे पांडे पडले आहेत. स्मार्टफोन इंडस्ट्री पण यातून वाचली नाही. Xiaomi ने गेल्या महिन्यात घोषणा केली होती कि कंपनी आपला 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला 5G स्मार्टफोन मी 10 भारतात पण लॉन्च करेल. या फोनची लॉन्च डेट आधी 31 मार्च ठरवण्यात आली होती पण देशात चालू असलेल्या लॉकडाउनमुळे हि डेट बदलावी लागली होती. आज आपल्या फॅन्सना भेट देत शाओमीने अनाउंस केले आहे कि आज पासून चार दिवसानंतर म्हणजे 8 मे ला हा पावरफुल फोन Xiaomi Mi 10 भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल.
Xiaomi ने ट्वीट करून खुलासा केला आहे कि येत्या 8 मे ला कंपनी भारतात आपला नवीन स्मार्टफोन Xiaomi Mi 10 लॉन्च करेल. कंपनी कोरोनामुळे कोणत्याही ईवेंटचे आयोजन करणार नाही तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा डिवाईस भारतीय बाजारात येईल. Xiaomi ने आपला ट्वीट मध्ये या आगामी फोनचे नाव Mi 10 5G सांगितले आहे, ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि हा भारतात येणारा शाओमीचा नेक्स्ट 5जी फोन असेल. 8 मे ला फोन लॉन्चची वेळ काय असेल याची वाट बघितली जात आहे.
Xiaomi Mi 10
शाओमी मी 10 बद्दल आधी बोलूया, हा स्मार्टफोन 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते तसेच शाओमीने फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च झाला आहे जो मीयूआई 11 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी Xiaomi Mi 10 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करतो.
This is gonna evoke a lot of excitement.
This is gonna #EvokeYourImagination.Mi fans, #Mi10 is launching on MAY 8th.
Yes, just 4⃣ days to go for the #108MP phone and more…
RT if you have been waiting for the launch date. pic.twitter.com/sFSfrpqIhB
— Mi India (@XiaomiIndia) May 4, 2020
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Xiaomi Mi 10 च्या बॅक पॅनल वर चार रियर कॅमेरा सेंसर्स देण्यात आले आहेत ज्यात 108 मेगापिक्सलचा प्राइमरी ISOCELL Bright HMX सेंसरचा समावेश आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या वाइड अँगल लेंस आणि दोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसर्सला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. शाओमी मी10 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या 4,780एमएएच च्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहे.
Xiaomi Mi 10 Pro
शाओमी मी10 प्रो सीरीजचा मोठा मॉडेल आहे. या फोन मध्ये पण 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेली 6.67 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मी 10 प्रो पण कंपनीने कर्व्ड डिजाईन वर बनवला आहे आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजीने सुसज्ज करून बाजारात आणला आहे. Xiaomi Mi 10 Pro पण एक 5G फोन आहे जो क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट वर चालतो. कंपनीने हा डिवाईस एंडरॉयड 10 आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला आहे.
https://img.hi.91mobiles.com/uploads/2020/01/Mi-10.jpg
Xiaomi Mi 10 Pro च्या कॅमेरा सेग्मेंट बद्दल बोलायचे तर फोन मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 108 मेगापिक्सलचा ISOCELL Bright HMX सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलची शार्ट टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलची मोठी टेलीफोटो लेंस आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वरील पंच होल मध्ये 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा डिवाईस पावर बॅकअपसाठी 50वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेल्या 4,500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.
शाओमी मी 10 वीडियो














