2 महिन्यात Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro चे 20 लाख युनिट विकले गेले

शाओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनु जैन यांनी रेडमी 7 सीरीजच्या यशाबद्दल एक ट्वीट केले. या ट्वीट मध्ये त्यांनी सांगितले कि फक्त 2 महिन्यातच कंपनी भारतात 20 लाख पेक्षा जास्त Redmi Note 7 आणि 7 प्रो स्मार्टफोन विकले आहेत. या ट्विट मध्ये कंपनी ने Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro चे वेगवेगळे किती यूनिट सेल केले याचा उल्लेख नाही.

विशेष म्हणजे Redmi Note 7 च्या पहिल्या फ्लॅश सेल मध्ये पण या डिवाइसने नवीन रेकॉर्ड केला होता. पहिल्या फ्लॅश सेल मध्ये कंपनी ने दावा केला होता कि त्यांनी 2,00,000 पेक्षा पण जास्त Redmi Note 7 स्मार्टफोन विकेल होते.

किंमत
Redmi Note 7 Pro
(4जीबी रॅम + 64जीबी मेमरी) = 13,999 रुपये
(6जीबी रॅम + 128जीबी मेमरी) = 16,999 रुपये

Redmi Note 7
(3जीबी रॅम + 32जीबी मेमरी) = 9,999 रुपये
(4जीबी रॅम + 64जीबी मेमरी) = 11,999 रुपये

Redmi Note 7 Pro स्पेसिफिकेशन्स
शाओमी Redmi Note 7 Pro चा कॅमेरा सेटअप फोनची सर्वात मोठी यूएसपी आहे. हा फोन एलईडी फ्लॅश सह डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स586 सेंसर प्राइमरी सेंसर तसेच 5-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. कंपनी ने Redmi Note 7 Pro चा रियर कॅमेरा सेटअप एआई टेक्नॉलॉजीने सुसज्ज केला आहे जो लाईट, नॉइज आणि ब्राइटनेस स्वतःच अडजस्ट करून शानदार फोटो कॅप्चर करतो. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा: Samsung Galaxy M40 लवकरच भारतात होईल लॉन्च, किंमत करेल हैराण

Redmi Note 7 Pro एंडरॉयडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे ज्याचा वापर कंपनीच्या यूजर इंटरफेस मीयूआई 10 सह शानदार होतो. प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 Pro मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे. Redmi Note 7 Pro 2 वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.

शाओमी Redmi Note 7 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच Redmi Note 7 Pro फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. Redmi Note 7 Pro मध्ये म्यूजिक साठी 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे तसेच एक्ट्ररनल यूएसबी ड्राईव साठी हा फोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Redmi Note 7 Pro मध्ये क्विक चार्ज 4 सपोर्ट असलेली 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन नेबुला रेड, नेप्चुन ब्लू आणि स्पेस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

हे देखील वाचा: फीचर फोन यूजर्स साठी एयरटेलने आणली खास भेट, या प्लान मध्ये मिळेल सर्वकाही

Redmi Note 7 स्पेसिफिकेशन
शाओमी Redmi Note 7 Pro सोबत शाओमी इं​डिया ने Redmi Note 7 स्मार्टफोन पण लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ​स्टाईल, डिजाईन आणि डिस्प्लेच्या बाबतीत Redmi Note 7 Pro सारखाच आहे. एंडरॉयड 9 पाई सह प्रोसेसिंग साठी Redmi Note 7 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन पण डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.या फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सलचा सॅमसंग प्राइमरी सेंसर तसेच 2-मेगापिक्सलचा डेफ्थ-सेंसिग सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये पण 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Redmi Note 7 मध्ये पण पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे जो फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रूबी रेड, ब्लॅक आणि सफायर ब्लू कलर मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here