Xiaomi-Realme मागे टाकण्यासाठी येत आहे Micromax, 10 हजार पेक्षा कमी किंमतीत लॉन्च होतील 3 नवीन स्मार्टफोन्स

अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला होता, ज्या नुसार भारत आता जगातील दुसरा मोठा मोबाईल निर्माता देश बनला आहे. यात चायनीज फोन निर्मात्यांचा मोठा वाटा आहे पण सध्या चीन विरोधात निर्माण झालेले वातावरण पाहता भारतीय कंपन्या पुन्हा भरारी घेण्यास तयार आहेत. कालच आम्ही बातमी दिली होती कि लावा येत्या काही दिवसांत मोठी तयारी करणार आहे आणि अनेक नवीन फोन घेऊन येणार आहे. दरम्यान अजून एका इंडियन मोबाईल कंपनी माइक्रोमॅक्सची बातमी पण येत आहे. बातमी अशी आहे कि Micromax लवकरच भारतात तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना बनवत आहे.

भारतीय मोबाईल फोन निर्माता कंपनी चायनीज फोन्सना टक्कर देण्यासाठी पुन्हा एकदा बाजारात एंट्री करण्यासाठी तयार दिसत आहे. बराच काळ बाजारातून गायब असलेल्या कंपनीसाठी पुन्हा प्रवेश करण्याची हि वेळ योग्य ठरू शकते. रिपोर्टनुसार माइक्रोमॅक्स आपल्या तीन फोन पैकी एक डिवाइस “प्रीमियम फीचर्स” आणि “आधुनिक लुक” सह बजेट कॅटगरी मध्ये सादर करेल.

विशेष म्हणजे माइक्रोमॅक्सने गेल्यावर्षी ऑक्टोबर 2019 मध्ये देशात आपला शेवटचा स्मार्टफोन iOne Note लॉन्च केला होता, जो सध्या ऑनलाइन 8,199 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच जर तुम्ही नॉन-चायनीज फोन विकत घेऊ इच्छित असाल तर इथे क्लिक करून बघू शकता संपूर्ण यादी.

टेक वेबसाइट NDTV Gadget 360 ला मिळालेल्या माहितीनुसार Micromax तीन स्मार्टफोन सह भारतात पुन्हा एंट्री करेल. सध्या कंपनी द्वारे हे फोन सॉफ्ट लॉन्च केले जातील. तसेच माइक्रोमॅक्स एकूण तीन नवीन फोन लॉन्च करेल, ज्यांची किंमत 10,000 रुपयांच्या आत असेल.

ट्विटर वर यूजर्सने कंपनीला मार्केट मध्ये परत येण्याच्या योजनेबाबत प्रश्न विचारला असता त्याला उत्तर देताना Micromax ने ट्विटर वर आपल्या नवीन फोनच्या लॉन्च बाबत माहिती दिली आहे. माइक्रोमॅक्सने ट्वीट केले आहे कि “आम्ही अंतर्गत स्थरावर मेहनत करत आहोत आणि लवकरच आम्ही काहीतरी मोठे करू. आमच्याशी जोडलेले रहा!”

इतकेच नव्हे तर कंपनीने अजून एका यूजरच्या ट्विटला उत्तर देताना सांगितले कि “कंपनी प्रीमियम फीचर्स असलेल्या एका नवीन डिवाइस वर काम करत आहे, जो आधुनिक लुक आणि बजेट मध्ये येईल.” कंपनीने स्पष्ट केले नाही कि ते भारतात नवीन मॉडेलची निर्मिती करणार आहे कि चीन मधील निर्मात्यांकडे आउटसोर्सिंग करणार आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here