हे सत्य आहे कि भारतात शाओमी, वीवो आणि ओपो सारख्या कंपन्या खूप प्रसिद्ध आहेत आणि ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोर वर यांच्ये राज्य पण आहे. या कंपन्यांचे फोन भारतात बनत आहेत तरीही अनेकलोक नॉन चायनीज ब्रँड फोनची मागणी करत आहेत. या कंपन्या सोडल्या तर यादी थोडी छोटी जर होते पण असे नाही कि पर्याय उपलब्ध नाहीत. प्रत्येक बजेट मध्ये काही खास फोन उपलब्ध आहेत जे स्पर्धेवर चांगले आहेत असे म्हणता येईल पुढे आम्ही बजेटनुसार अश्याच फोन्सची संपूर्ण यादी तयार केली आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या बजेट मध्ये बेस्ट नॉन चायनीज ब्रँडचे फोन विकत घेणे सोप्पे होईल.
7,000 रुपयांच्या बजेट मध्ये
या बजेट मध्ये लोक असा फोन शोधतात ज्यात प्रामुख्याने इंटरनेट, व्हाट्सऍप सारखे ऍप्स चालू शकतील. इथे गेमिंग आणि हेवी ग्राफिक्ससाठी तुमच्याकडे काही नसते. ईमेल, म्यूजिक आणि वीडियो सारखी छोटी मोठी कामे आटोपण्यासाठी फोन सक्षम असेल तरी पुरे असते. या बजेट मध्ये नोकिया, एलजी़, सॅमसंग आणि पॅनासोनिकचे काही फोन्स उपलब्ध आहेत. यांची यादी तुम्ही बघू शकता.
10,000 रुपयांच्या बजेट मध्ये
भारतात सर्वात जास्त मागणी या बजेटच्या स्मार्टफोन्सची आहे. लोक फोनसाठी खूप जास्त पैसे खर्च करू इच्छित नाहीत आणि अश्या फोनचा शोध घेतात जो ऑलराउंडर असेल. म्हणजे डिजाइन डिस्प्ले आणि परफॉर्मेंस आणि खासकरून कामेयाच्या बाबतीत बेस्ट असावा. जर तुम्ही पण अश्या फोनचा शोध घेत असाल तर तुमच्याकडे सॅमसंग, एलजी, नोकिया, असूस आणि भारतीय ब्रँड लावा सहित काही फोन्सचे पर्याय आहेत ज्यांची यादी तुम्ही पुढे बघू शकता.
15,000 रुपयांच्या बजेट मध्ये
हा बजेट असा आहे ज्यात तुम्हाला परफॉर्मेंस सोबतच लुक आणि गेमिंग पण हवी असते. अलीकडेच 15,000 रुपयांच्या बजेट मधील फोन्सची मागणी वाढली आहे आणि या बजेट मध्ये अनेक चांगले फोन्स पण उपलब्ध आहेत. जर तुम्ही नॉन चायनीज ब्रँड कडे जाणार असाल तर सॅमसंग, नोकिया, एलजी आणि असूसचे फोन्स उपलब्ध होतील.
20,000 रुपयांच्या बजेट मध्ये
भारतात कोणत्याही फोनसाठी 20,000 रुपयांचा बजेट खूप मोठा म्हणता येईल आणि यात तुम्ही लुक, स्टाइल आणि परफॉर्मेंस सोबतच शानदार कॅमेरा आणि अडवांस फीचर्स पण बघता. या बजेट मध्ये तुमच्याकडे सॅमसंग व्यतिरिक्त एलजी आणि नोकियाचे फोन्स उपलब्ध आहेत.
प्रीमियम सेग्मेंट मध्ये
प्रीमियम सेग्मेंट मध्ये ऍप्पलचे नाव येणे साहजिक आहे. परंतु लक्षात घ्या ऍप्पलचे मुख्यालय यूएस मध्ये असलेतरी कंपनीचे नवीन फोन चीन मधेच बनतात. काही जुन्या मॉडेल्सची निर्मिती भारतात केली जात आहे त्यामुळे हा फोन घ्यावा कि नाही याचा याचा निर्णय तुम्हीच घ्या. सॅमसंग, एलजी, नोकिया आणि असूस सहित काही मॉडेल्स पण या सेगमेंट मध्ये उपलब्ध आहेत जे तुम्ही बघू शकता.