कमी किंमतीत 6 कॅमेरे, 8GB रॅम आणि 4500mAh बॅटरी सह आला हा फोन, Xiaomi-Realme ला मिळेल टक्कर

Tecno ने टेक मंचावर अखेरीस आपला बहूप्रतिक्षीत स्मार्टफोन Camon 16 Premier लॉन्च केला आहे. स्मार्टफोनची यूएसपी एक क्वाड-कॅमेरा सेटअप आणि 90 हर्ट्ज डिस्प्ले असे फीचर्स आहेत. इतकेच नव्हे तर हँडसेट एका टॉप-एंड गेमिंग प्रोसेसर सह येतो जो गेमिंगचा चांगला अनुभव देतो. याआधी ट्रांजिशन इंडियाने या आठवड्यात आपला नवीन आणि स्वस्त हँडसेट Tecno Spark Go 2020 लॉन्च केला होता. हा फोन भारतात सादर कधी उपलब्ध होईल याची माहिती देण्यात आलेली नाही.

डिजाइन

Camon 16 Premier कंपनीने खास डिजाइन सह सादर केला आहे. फोनच्या फ्रंटला पिल-शेप्ड डुअल सेल्फी होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या टॉप लेफ्टला होल-पंच आहे, ज्यात दोन सेल्फी कॅमेरा सेंसर एकमेकांपासून थोड्या अंतरावर आहेत. तसेच फोनच्या फ्रंटला टॉप आणि बॉटमला बारीक बेजल्स दिसतील. पण डाव्या आणि उवा बाजूला कमी बेजल्स आहेत. डिवाइसच्या बॉटमला टाइप-सी पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि माइकला जागा देण्यात आली आहे. रियर पॅनल वर या फोन मध्ये फ्लॅगशिप लेवल चौकोनी क्वाड कॅमेरा मध्यभागी दिला आहे. फोनच्या उजिवाकडे वॉल्यूम रॉकर बटन आहे, ज्याच्या खाली पावर ऑन-ऑफ बटन पण आहे.

आहेत 6 कॅमेरे

कॅमेऱ्याबाबत बोलायचे तर यात फ्रंटला दोन आणि मागे चार सेंसर आहेत. मागे एक 119 डिग्री एंटी-डिस्ट्रोशन सुपर वाइड अँगल 8-मेगापिक्सल कॅमेरा आणि मॅक्रो लेंस सह 2-मेगापिक्सल डेप्थ सेंसर, 64-मेगापिक्सल सोनी IMX686 प्राइमरी कॅमेरा सेंसर, 2-मेगापिक्सल 1080p अल्ट्रा नाइट पोर्टेट लेंस सह LED आहे. Tecno Camon 16 Premier मध्ये वीडियो कॉलिंग आणि सेल्फी कॅमेऱ्यासाठी फ्रंटला दोन सेंसर आहेत. यातील एक 48-मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलची 105 डीग्री अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि डुअल फ्रंंट फ्लॅश आहे.

स्पेसिफिकेशन्स

Techno Camon 16 Premier मध्ये 6.9-इंचाचा FHD dual डॉट-इन डिस्प्ले आहे जो 90Hz रिफ्रेश रेट, 20:5:9 आस्पेक्ट रेश्यो आणि HDR10+ ला सपोर्ट करते. तसेच फोन मध्ये मीडियाटेक MediaTek G90T चिपसेट सह Cortex-A76 CPU आणि माली G76 जीपीयू आहे. स्मार्टफोन मध्ये 8GB RAM आणि 128GB ची स्टोरेज देण्यात आली आहे.

हार्डवेयर सह हीट कमी करण्यासाठी फोन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी पण देण्यात आली आहे. जी 2 डिग्री पर्यंत फोन थंड करू शकते. हँडसेट मध्ये पवार बॅकअपसाठी 4,500mAh ची नॉन-रिमूवेबल बॅटरी 33W फ्लॅश चार्जिंग सपोर्ट सह आहे. कंपनीचा दावा आहे कि फ्लॅश चार्जर 30 मिनिटांत 70 टक्के चार्ज करू शकतो.

कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर Tecno Camon 16 प्रीमियर मध्ये GSM, WCDMA, LTE (FDD, TDD), GPRS, HSPA +, FULL EDGE, GPS, WIFI, FM, BT, आणि OTG चा समावेश आहे. स्मार्टफोन एंड्रॉइड 10 वर HiOSसह चालतो. हा स्मार्टफोन ग्लेशियर सिल्वर, गोमेद ब्लॅक, आइस क्रिस्टल ब्लू, मिस्टी ग्रे, क्लाउड व्हाइट आणि प्यूरिस्ट ब्लू रंगात येतो. आतापर्यंत स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धताची घोषणा करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here