येत आहे Google चा स्वस्त फोन Pixel 5s, लॉन्चच्या आधी बघा डिजाइन

यावर्षी ऑगस्ट मध्ये गूगलने पिक्सल 4ए लॉन्च करताना Pixel 5 and Pixel 4a 5G ची घोषणा केली होती, जे यावर्षीच्या शेवट पर्यंत लॉन्च केले जाऊ शकतात. हे फोन्स भारतात नाही तर अमेरिका आणि इतर ठिकाणी लॉन्च केले जातील. आता पिक्सल 5 सीरीज मधील अजून एका नवीन फोनची माहिती समोर आली आहे. गूगल पिक्सल 5एस नावाच्या या फोनचे काही फोटो इंटरनेट वर लीक झाले आहेत, असे वाटत आहे कि कंपनी हा फोन कमी किंमतीत सादर केला जाईल.

मेक्सिकन रेडियो पर्सनालिटी @japonton ने ट्विटर वर गूगल पिक्सल 5एस चे फोटो शेअर केले आहेत. फोटोज मध्ये फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. या फोटोजनुसार डिवाइसच्या फ्रंटला डाव्या कोपऱ्यावर पंच होल असेल. तसेच मागे डाव्या बाजूला चौकोनी रियर कॅमेरा सेटअप आणि मध्यभागी फिंगरप्रिंट सेंसर असेल. फोन मध्ये वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन उजवीकडे आहेत. एका फोटो मध्ये 5एस असे नाव दिसत आहे, ज्यावरून वाटत आहे कि हा फोन गूगल पिक्सल 5एस नावाने सादर केला जाईल. हा फोन कधी येईल कंपनीने याची माहिती मात्र दिलेली नाही.

Pixel 5

काही दिवसांपूर्वी पिक्सल 5 बेंचमार्किंग लिस्टिंग मध्ये दिसला होता. लिस्टिंग नुसार Google Pixel 5 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G 5G चिपसेट दिला जाईल. तसेच फोन मध्ये 8GB रॅम असेल. गेल्यावर्षी कंपनीने Google Pixel 4 आणि Pixel 4 XL स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सह सादर केला होता. बेंचमार्किंग लिस्टिंग वरून वाटत आहे कि कंपनी अपकमिंग पिक्सल 5 मध्ये प्रीमियम हाई-एंड स्पेसिफिकेशन्स देणार नाही. Google Pixel 5 च्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बाबत अजून माहिती येणे बाकी आहे. Google Pixel 5 आणि Pixel 4a 5G भारतात येणार नाहीत. त्यामुळे भारतीयांना फक्त Google Pixel 4a ची वाट बघावी लागेल. पिक्सल 4ए बद्दल बोलायचे तर हा फोन भारतात ऑक्टोबर मध्ये Flipkart वर विक्रीसाठी येऊ शकतो.

Google Pixel 4a

गूगल पिक्सल 4ए मध्ये 5.81 इंचाचा फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले आहे. तसेच फोन एंडरॉयड 10 वर चालतो. डिवाइस मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट आहे. फोन 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट सह सादर केला गेला होता.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Google Pixel 4a च्या मागे 12 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. Google Pixel 4a 4जी वोएलटीई सपोर्ट, एनएफसी, 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप सी सारख्या फीचर्स सह येतो. हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 3,140एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. गूगल पिक्सल 4ए जेट ब्लॅक कलर मध्ये लॉन्च केला गेला होता.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here