BSNL चा धमाका, लॉन्च केले 4 नवीन Bharat Fiber प्लान, Jio ला मिळेल आव्हान

Reliance JioFiber आणि इतर टेलीकॉम कंपन्यांना आव्हान सादर करत सरकारी कंपनी बीएसएनएलने चार नवीन ब्रॉडबॅंड प्लान्स सादर केले आहेत. हे नवीन प्लान्स भारत फायबर कॅटेगरी मध्ये सादर करण्यात आले आहेत. तसेच BSNL च्या या नवीन ब्रॉडबॅंड प्लान्सची किंमत 449 रुपयांपासून सुरु होत आहे. हे प्लान्स काही निवडक शहरांमध्ये 1 ऑक्टोबर पासून लागू होतील. या प्लान्सची किंमत 449 रुपये, 799 रुपये, 999 रुपये आणि 1499 रुपये आहे. कंपनीने हे प्लान्स प्रमोशनल स्वरुपात सादर केले आहेत, जे सध्या 90 दिवसांसाठी वैध असतील.

टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार कंपनीने या प्लान्सना Bharat Fiber प्लानचे नाव दिले आहे. विशेष म्हणजे 999 रुपये आणि 1499 रुपयांच्या प्लान सह Disney+ Hotstar ची प्रीमियम मेंबरशिप फ्री मिळत आहे. तसेच या प्लान्स मध्ये फ्री कॉलिंगचा लाभ पण दिला जात आहे.

499 रुपयांचा प्लान

या प्लान मध्ये यूजर्सना 30 Mbps की स्पीड सह 3.3TB (3300GB) डेटा दिला जात आहे आणि यात अनलिमिटेड वॉइस कॉलिंग मिळते. तसेच लिमिट संपल्यावर स्पीड कमी होऊन 2 एमबीपीएस होतो, पण इंटरनेट वापरता येते. तसेच ग्राहकांना अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा पण मिळते. हा प्लान ‘अंदमान आणि निकोबार’ सर्कल सोडून बाकी सर्व राज्यांमध्ये लागू होईल.

799 रुपयांचा प्लान

799 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 100 Mbps स्पीड सह 3.3TB (3300GB) डेटा मिळतो. लिमिट संपल्यावर स्पीड कमी होऊन 2 एमबीपीएस होतो. 499 रुपयांच्या प्लान मध्ये पण इतकाच डेटा मिळतो पण स्पीड कमी आहे.

999 रुपयांचा प्लान

यात यूजर्सना 200 Mbps स्पीड सह 3.3TB (3300GB) डेटा मिळतो. लिमिट संपल्यावर स्पीड कमी होऊन 2 एमबीपीएस होतो. प्लान सह अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा लाभ पण मिळेल.

1499 रुपयांचा प्लान

या प्लान मध्ये यूजर्सना 300 Mbps स्पीड सह 4TB (4000GB) डेटा दिला जात आहे. पण काही शहरांमध्ये कमाल 200Mbps चा स्पीड मिळतो. लिमिट संपल्यावर स्पीड कमी होऊन 4 एमबीपीएस होतो. यात पण अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा पण दिली जात आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here