सर्वात ताकदवान प्रोसेसर आणि 108MP कॅमेऱ्यासह आले Mi 10T Pro आणि Mi 10T, आता बदलेल स्मार्टफोनची दुनिया

Xiaomi ने अखेरीस आज टेक मार्केट मध्ये आपली ‘मी 10टी सीरीज’ सादर केली आहे. या सीरीज अंतर्गत Mi 10T, Mi 10T Lite 5G आणि Mi 10T Pro 5G स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत. मी 10टी सीरीज यावर्षी फेब्रुवारी मध्ये आलेल्या Mi 10 सीरीजचा फॉलो-अप आहे. या स्मार्टफोन्स संबंधित अनेक लीक गेल्या अनेक दिवसांपासून समोर आले होते, ज्यांच्यावर पूर्णविराम लागला आहे. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला मी 10टी आणि मी10टी प्रो बाबत माहिती देणार आहोत.

डिजाइन

डिजाइन पाहता दोन्ही मी 10टी आणि मी 10टी प्रो स्मार्टफोन मध्ये सेल्फीसाठी होल-पंच डिजाइन देण्यात आली आहे जो फ्रंटला उजवीकडे वरच्या बाजूला आहे. पंच-होलमुळे फोनच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत. तसेच बॉटमला बारीक चिन पार्ट आहे. तसेच दोन्ही फोन मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल. दोन्ही वेरिएंट्स मध्ये 5जी सपोर्ट असेल. फोन्सच्या मागे स्क्वायर शेप ट्रिपल कॅमेरा आहे. या सेटअप मध्ये वरच्या बाजूला मोठा सेंसर आणि खालच्या बाजूला तीन सेंसर सह एक एलईडी लाइट आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Mi 10T आणि Mi 10T Pro मध्ये 6.67 इंचाच्या आईपीएस एलसीडी स्क्रीन सह फुल-एचडी+ 1,080×2,340 पिक्सल रिजोल्यूशन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोन्सचा डिस्प्ले 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो सह येतो. याआधी कंपनीने Mi 10 Ultra 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करणाऱ्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ ओएलईडी डिस्प्ले सह सादर केला होता.

दोन्ही फोनचे मेन सेंसर वेगवेगळे आहेत. Mi 10T Pro बद्दल बोलायचे यात 108-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सह देण्यात आली आहे. Mi 10T मध्ये 64-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. मेन सेंसर व्यतिरिक्त दोन्ही फोन मध्ये देण्यात आलेले सेल्फी कॅमेरा आणि दोन्ही सेंसर एक सारखे आहेत. फोन्स मध्ये बाकि दोन सेंसर पाहता एक 13-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आहे. कॅमेरा सेटअप मध्ये 5-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस पण आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी फोन्स मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Xiaomi Mi 10T आणि Mi 10T Pro स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या सर्वात पावरफुल स्नॅपड्रॅगॉन 865+ चिपसेट वर लॉन्च केला गेला आहे जो एड्रेनो 650 जीपीयू सह येईल. विशेष म्हणजे या चिपसेट सोबत या स्मार्टफोन्स मध्ये 5G कनेक्टिविटी सपोर्ट पण मिळतो. तसेच मी10 टी मध्ये 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी + 128 जीबी वेरिएंट आहे. दुसरीकडे मी 10टी प्रो मध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट व्यतिरिक्त दुसरा 8 जीबी + 256 जीबी स्टोरेज वेरिएंट पण आहे.

शाओमी म्हणते आहे कि मी 10टी प्रो आणि मी 10टी मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग सह येते. कंपनीने या दोन्ही फोन सह MMT नावाची नवीन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर केली आहे. चांगली बातमी आहे कि 33वॉट चार्जर फोन सोबत दिला जाईल.

कनेक्टिविटीसाठी मी 10टी आणि मी10 टी प्रो मध्ये डुअल बॅंड फाई-वाई, डुअल सिम सपोर्ट, एनएफसी, ब्लूटूथ 5.1, डुअल फ्रीक्वैंसी जीपीएस, आईआर ब्लास्टर आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आली आहे. तसेच या फोन्स मध्ये 3.5 हेडफोन जॅक पण आहे. सोबतच दोन्ही फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतात.

किंमत

Mi 10T च्या 6GB RAM आणि 128GB वेरिएंटची किंमत EUR 499 (जवळपास 43,000 रुपये) आणि 8GB + 128GB वेरिएंटची किंमत EUR 549 (जवळपास 47,300 रुपये) आहे. हा फोन Cosmic Black आणि Lunar Silver कलर ऑप्शन मध्ये येतो. Mi 10T Pro के 8GB + 128GB वेरिएंटची किंमत EUR 599 (जवळपास 51,700 रुपये) आणि 8GB + 256GB वेरिएंटची किंमत EUR 649 (जवळपास 56,000) रुपये आहे.

हा फोन Cosmic Black, Aurora Blue आणि Lunar Silver कलर ऑप्शन मध्ये येतो. तसेच समोर आलेल्या माहिती नुसार Mi 10T सीरीज भारतात ऑक्टोबरच्या मिड मध्ये लॉन्च होईल. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here