Samsung च्या बजेट कॅटेगरी मध्ये आगामी Galaxy A02s स्मार्टफोन बद्दल अनेक दिवसांपासून लीक बातम्या समोर येत आहेत. अलीकडेच फोनचा मॉडेल नंबर SM-A025G सह गीकबेंच वर दिसला होता. लिस्टिंग मध्ये फोनचा सिंगल कोर स्कोर 756, तर मल्टी-कोर टेस्ट स्कोर 3,934 होता. तसेच लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि फोन 3 जीबी रॅम आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर सह येऊ शकतो. आता Galaxy A02s FCC वर लिस्ट केला गेला आहे, जिथे फोनच्या डिजाइन आणि बॅटरी क्षमतेचा खुलासा झाला आहे. लिस्टिंग नुसार Samsung Galaxy A02s मॉडेल नंबर SM-A025M/DS सह दिसला आहे.
लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या इमेज नुसार फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल टॉप-लेफ्टला असेल. आशा आहे कि या कॅमेरा सेटअप मध्ये कमीत कमी दोन कॅमेरे असतील. पण हे निश्चित समजले नाही. फोनच्या फ्रंट डिजाइनचा खुलासा पण अजून झाला नाही.
हे देखील वाचा : Samsung Galaxy S10 Lite बनला सीरीजचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन, कंपनीने किंमतीत केली मोठी कपात
लिस्टिंग नुसार Samsung Galaxy A02s मध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल. अजूनतरी फोन मध्ये फास्ट चार्जिंगला सपोर्ट असल्याची माहिती मिळाली नाही. अडॅप्टरचा मॉडेल नंबर- IEP-TA200 आहे, जो इशारा करतो कि हा 15W फास्ट-चार्जिंग सपोर्ट सह येईल आणि हा UL Demko सर्टिफिकेशन वर स्पॉट केला गेला आहे. Galaxy A02s FCC लिस्टिंग मध्ये समोर आला आहे कि फोन डुअल सिम वेरिएंट सह येईल.
काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी ए02एस फोन कथितरित्या थायलंडच्या NBTC सर्टिफिकेशन साइट वर पण दिसला होता, जिथे याच्या त्वरित लॉन्चची माहिती मिळाली होती. एनबीटीसी लिस्टिंग मध्ये समजले आहे कि हा फोन डुअल-सिम वेरिएंट असेल. विशेष म्हणजे मॉडेल नंबर SM-A025F सह येणारा स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी ए02 असल्याचे बोलले जात आहे, जो गेल्या महिन्यात गीकबेंच वर लिस्ट झाला होता.
हे देखील वाचा : 9,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे पावरफुल Samsung Galaxy S20 FE स्मार्टफोन, हीच आहे विकत घेण्याची सुवर्णसंधी
Samsung Galaxy A02 स्मार्टफोन पाहता हा काही दिवसांपूर्वी चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण दिसला होता. या लिस्टिंग मध्ये खुलासा झाला होता कि गॅलेक्सी ए02 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल जो वनयूआई सह काम करेल. तसेच प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असल्याचा खुलासा झाला होता. गीकबेंच नुसार सॅमसंग गॅलेक्सी ए02 2 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला जाईल आणि ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 506 जीपीयूला सपोर्ट करेल.














