गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीने नुकसान भरपाईसाठी टॅरिफ महाग केले होते. तेव्हा Jio आणि Airtel च्या आधी वोडाफोन आयडिया (Vi) भारतात प्रीपेड टॅरिफची किंमत वाढवणारा पहिला टेलीकॉम नेटवर्क होता. तसेच आता लाइव मिंटच्या एका रिपोर्टनुसार, टेलीकॉम नेटवर्क प्रीपेड टॅरिफच्या किंमती वाढवण्यासाठी तयार दिसत आहे. वोडाफोन आयडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रविंदर टक्करने म्हटले आहे कि टॅरिफचे दर वाढवण्याच्या बाबतीत पहिले पाऊल टाकण्याच्या बाबतीत ते मागे पुढे पाहणार नाहीत. तसेच याआधी एयरटेलकडून पण असे विधान करण्यात आले होते.
सध्या Jio जवळपास 400 मिलियन वापरकर्त्यांसह भारतीय दूरसंचार क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनी खूप दिवसांपासून नवीन ग्राहकांना जोडण्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे. तर एयरटेल ARPU आणि महसूल वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असे वाटत आहे कि वोडाफोन आयडिया (वीआय) पण अशी योजना बनवत आहे.
टक्कर यांनी म्हटले कि मला वाटत नाही कोणत्याही कारणांमुळे दरवाढ थांबू शकत नाही, किमान दर ठरण्याबाबत चर्चा चालू आहे. हे आधी पण झाले आहे आणि याची पुनरावृत्ती न होण्याचे मला असे कोणतेही कारण दिसत नाही.
हे देखील वाचा : Vi ने सादर केले 8 नवीन रिचार्ज पॅक, मिळेल अनलिमिटेड टॉक टाइम
काही दिवसांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता, ज्यात सांगण्यात आले होते कि पुढल्या 12 ते 18 महिन्यांत दोनदा टॅरिफ महाग होऊ शकतात. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि पुढील सहा महिन्यात एकदा कंपन्या आपले रिचार्ज महाग करतील आणि असे करणे मार्केट मध्ये त्यांच्यासाठी स्थिरता आणण्यासाठी गरजेचे आहे. तसेच टॅरिफ मध्ये यावेळी किती वाढ होईल याबाबत आतातरी काही सांगता येणार नाही.














