5,160mAh बॅटरी, 8GB रॅम आणि पावरफुल स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटसह POCO X3 Pro झाला लॉन्च

Xiaomi सोबत हिट झाल्यानंतर जेव्हा POCO एक स्वतंत्र ब्रँड बनला होता तेव्हापासुन लोकांना आशा होती की कंपनी कमी किंमतीत हाईएंड स्पेसिफिकेशन्स असलेले फोन घेऊन येईल आणि पोको फॅन्सचा विश्वास कायम ठेवेल. आज आपल्या त्याच फॅन्ससाठी पोकोने एक साथ दोन नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीने पावरफुल POCO X3 Pro आणि POCO F3 टेक मंचावर लॉन्च केले आहेत. मोठी बॅटरी आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह हे फोन्स शानदार लुकला सपोर्ट करतात. पोको एक्स3 प्रो चे फुल स्पेसिफिकेशन्स पुढे दिले आहेत.

डिस्प्ले
POCO X3 Pro कंपनीने पंच होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे त्यामुळे कंपनीने याला डॉटनॉच असे नाव दिले आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच होल देण्यात आला आहे जो बॉडी पार्टपासून थोडा दूर आहे. हा फोन कोर्निंग गोरिल्ला 6 ने प्रोटेक्टेड 6.67 इंचाच्या एफएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतो.

प्रोसेसिंग
POCO X3 Pro एंडरॉयड 11 ओएस आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.9गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 640 जीपीयू आहे. हा फोन LPDDR4x रॅम आणि UFC 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी
पोको एक्स3 प्रो मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स582 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन एफ/1.22 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

पावर बॅकअप
ताकदवान स्पेसिफिकेशन्स सोबत पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये दमदार बॅटरी पण देण्यात आली आहे. POCO X3 Pro स्मार्टफोन 5,160एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीच्या दाव्यानुसार पोको एक्स3 प्रो ची बॅटरी एका चार्जमध्ये 11 तासांची गेमिंग आणि 18 तासांचा वीडियो प्लेबॅक देऊ शकते.

वेरिएंट्स व प्राइस
POCO X3 Pro ग्लोबल मार्केटमध्ये दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो, ज्याची किंमत 249 यूरो म्हणजे इंडियन करंसीनुसार 21,500 रुपयांच्या आसपास आहे. तसेच फोनच्या मोठ्या वेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे आणि या वेरिएंटची किंमत 299 यूरो म्हणजे 25,700 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Phantom Black, Frost Blue आणि Metal Bronze कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here