Motorola Edge S 5G फोन क्वाॅलकाॅमच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 870 सह 26 जानेवारीला होईल लाॅन्च

(Image credit: Future)

Motorola ने गेल्या वर्षी एप्रिल मध्ये आपल्या ‘ऐज सीरीज’ मध्ये दोन पावरफुल स्मार्टफोन Motorola Edge आणि Motorola Edge+ लाॅन्च केले होते. यात मोटोरोला ऐज प्लस भारतीय बाजारात पण विक्रीसाठी उपलब्ध झाला होता जो तेव्हा पावरफुल फीचर्स जसे कि 90हर्ट्ज डिस्प्ले, 108 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगॉन 865 चिपसेट सह आला होता. आता बातमी येत आहे कि मोटोरोला आपल्या या फ्लॅगशिप सीरीजचा विस्तार करणार आहे कि ज्या अंतर्गत येत्या 26 जानेवारीला नवीन स्मार्टफोन Motorola Edge S लाॅन्च केला जाईल.

Motorola Edge S च्या लाॅन्चची घोषणा कंपनीने केली आहे. मोटोरोलाने सांगितले आहे कि येत्या 26 जानेवारीला कंपनी एक वर्चुअल ईवेंटचे आयोजन करेल, ज्याच्या मंचावरून नवीन डिवायस ऐज एस टेक मंचावर येईल. या दिवशी हा स्मार्टफोन चीनी बाजारात लाॅन्च केला जाईल जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये येईल. Motorola Edge S 5G फोन असेल जो क्वाॅलकाॅम द्वारे गेल्या आठवड्यात अनाउंस केल्या गेलेल्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 870 सह लाॅन्च होईल. हा चिपसेट 3.2गीगाहर्ट्जच्या सुपर फास्ट स्पीड वर प्रोसेस करतो.

Moto Edge S

Motorola Edge+

भारतातील मोटोरोला ऐज प्लस पाहता या फोन मध्ये 1080 × 2340 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.67 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आली आहे जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. हा फोन अँड्रॉइड 10 वर सादर केला गेला आहे जो क्वालकॉमच्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 865 वर चालतो. हा चिपसेट 5Gला सपोर्ट सह येतो. हा फोन 12 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : स्वस्त Realme C20 च्या लॉन्चच्या आधी समोर आली किंमत आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

कॅमेरा पाहता या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये ज्याचा प्राइमरी कॅमेरा f/1.8 अपर्चर सह 108 मेगापिक्सल (with OIS) + टेलीफोटो लेंस (with OIS) + 16 मेगापिक्सल अल्ट्रावाइड (doubles up as macro) ToF सेंसर आणि 8 मेगापिक्सल लेजर ऑटोफोकस आहे. तसेच फोन मध्ये 3X ऑप्टिकल झूमची क्षमता पण देण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर फोनच्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा सिंगल होल-पंच कॅमेरा आहे.

Motorola Edge Plus

मोटोरोलाच्या या फ्लॅगशिप फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W टर्बो चार्ज (वायर सह) आणि वायरलेस 15W ला सपोर्ट करते. फोन मध्ये वायरलेस पावरशेयर म्हणजे रिवर्स वायरलेस चार्जिंगचा ऑप्शन देण्यात आला आहे. Motorola Edge+ सध्या भारतीय बाजारात 59,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here