OPPO ने टेक मंचावर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ‘रेनो सीरीज’ चा विस्तार केला आहे. कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारात ओपो रेनो 5 सीरीज सादर केली आहे त्याअंतर्गत OPPO Reno 5 आणि OPPO Reno 5 Pro स्मार्टफोन लाॅन्च केले गेले आहेत. हे दोन्ही डिवायस 5G ला सपोर्ट करतात जे सध्या चीनी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील. 64 मेगापिक्सल क्वाॅड कॅमेरा, 65वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट आणि लार्ज डिस्प्ले काही असे पॉईंट्स आहेत जे ओपो रेनो 5 सीरीजला इतरांपेक्षा खास आणि ताकदवान बनवतात.
OPPO Reno5 5G
ओपो रेनो 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला आहे. हा एक ओएलईडी डिस्प्ले आहे जो 2.5डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. या ओपो फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित लेटेस्ट अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च झाला आहे जो 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वाॅलकाॅम स्नॅपड्रॅगॉन 765जी चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रेनो 620 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा फोन 4,300एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.

OPPO Reno5 Pro 5G
ओपो रेनो 5 प्रो पाहता कंपनीने हा स्मार्टफोन 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ स्क्रीन वर लाॅन्च केला गेला आहे. हा फोन पण ओएलईडी डिस्प्ले पॅनल वर बनला आहे जो 23डी ग्लासने प्रोटेक्टेड आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते. हा फोन कलरओएस 11 आधारित अँड्रॉइड 11 ओएस वर लाॅन्च केला गेला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या डायमनसिटी 1000+ चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये माली जी77 एमसी9 जीपीयू देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 4,350एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो आणि हि पण 65वाॅट सुपर फ्लॅश चार्ज SuperVOOC 2.0 फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी वर चालते.
हे देखील वाचा : 7,000एमएएच बॅटरी असलेला Samsung Galaxy M12 वेबसाइट वर लिस्ट, स्पेसिफिकेशन्सचा झाला खुलासा
फोटोग्राफी
दोन्ही स्मार्टफोन क्वाॅड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.7 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्यासोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मोनो लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी हे दोन्ही डिवायस एफ/2.4 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतात.
वेरिएंट्स व प्राइस
ओपोने हे दोन्ही स्मार्टफोन दोन वेरिएंट्स मध्ये लाॅन्च केले आहेत. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. OPPO Reno5 चा 8 जीबी रॅम वेरिएंट 2699 युआन (जवळपास 30,400 रुपये) तसेच 12 जीबी रॅम वेरिएंट 2999 युआन (जवळपास 33,800 रुपये) मध्ये लाॅन्च केला गेला आहे. तसेच OPPO Reno5 Pro चा 8 जीबी रॅम तसेच 12 जीबी रॅम वेरिएंट क्रमशः 3399 युआन (जवळपास 38,000 रुपये), 3799 युआन (जवळपास 42,700 रुपये) मध्ये लाॅन्च झाला आहे.















