Vivo Y31 गुगल वर झाला लिस्ट, 4GB रॅम, स्नॅपड्रॅगॉन 662 आणि अँड्रॉइड 11 सह होईल लॉन्च

Vivo बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि कंपनी आपल्या Y-सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. आता पर्यंत समोर आलेल्या लीक बातम्यांनुसार कंपनी वाय-सीरीज मध्ये एक नवीन फोन Y31 लवकरच सादर करू शकते. काही दिवसांपूर्वीच हा फोन कथितरित्या NBTC, BIS सह कथितरित्या सिंगापूर मध्ये IMDA आणि रशियात EEC सर्टिफिकेशन वर स्पॉट केला गेला होता. तर, आज फोन गुगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये दिसला आहे, जिथे फोनचे काही स्पेसफिकेशन्स पण समोर आले आहेत.

Google Play कंसोल लिस्टिंग मध्ये समोर आलेल्या फोटो मध्ये Vivo Y31 स्मार्टफोनचा लुक पण समोर आला आहे. फोटोनुसार डिवाइस वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले सह सादर केला जाईल. तसेच, हँडसेट मध्ये वॉल्यूम अप, डाउन बटन व पावर बटन उजवीकडे असेल. तसेच डिवाइसच्या डावीकडे एक बटन असेल जे डेडिकेट असिस्टंट बटनचे काम करेल. सोबतच फोनच्या वरच्या बाजूला 3.5एमएम हेडफोन जॅक दिला जाईल.

तसेच Vivo Y31 अक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 प्रोसेसर सह सादर केला जाईल. फोन मध्ये 4GB रॅम पण असेल. वीवो वाय31 लेटेस्ट अँड्रॉइड ओएस वर काम करेल. वीवोचा हा फोन रशियात EEC आणि सिंगापूर मध्ये IMDA सर्टिफिकेशन्स वर V2036 मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला होता. आतापर्यंत कंपनीने फोनच्या अस्तित्वाबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

अलीकडेच बातमी समोर आली होती, ज्यात सांगण्यात आले होते कि वीवो आपली लेटेस्ट V20 सीरीज अपग्रेड करण्याची योजना बनवत आहे. अलीकडेची त्याचा पब्लिकेशनने Vivo V20 (2021) इंडोनेशिया टेलीकॉम आणि भारतीय मानक ब्यूरोच्या वेबसाइट वर बघितला होता.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here