3,900mAh बॅटरी सह लिस्ट झाला Nokia चा स्वस्त फोन, जाणून घ्या कधी करेल एंट्री

काही दिवसांपूर्वी नोकियाचे दोन नवीन स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट झाले होते, यामुळे वाटत होते कि साल 2021 साठी नोकियाने तयारी करायला सुरवात केली आहे. हे फोन लिस्ट झाल्यानंतर काही दिवसानंतर नोकियाचा अजून एक नवीन फोन सर्टिफिकेशन साइट वर समोर आला आहे. मॉडेल नंबर TA-1322 सह एक नोकिया स्मार्टफोन यूएस फेडरल कम्युनिकेशंस कमिशन (FCC) च्या वेबसाइट वर दिसला आहे. हा हँडसेट कथितरित्या एका रशियन सर्टिफिकेशन वेबसाइट वर पण दिसला आहे. स्मार्टफोनचे नाव सांगण्यात आले नाही. पण आधीच्या रिपोर्ट्स मधून समजले आहे कि फोन नोकिया 4.4 किंवा नोकिया 7.3 असू शकतो.

एफसीसी वेबसाइट वर लिस्टिंग नुसार एचएमडी ग्लोबलचा हा फोन मॉडेल नंबर TA-1322 सह येईल. लिस्टिंग नुसार फोन मध्ये 3,900mAh बॅटरी असेल. सोबतच फोनचे स्केच पण लिस्टिंग मध्ये समोर आले आहे. या स्केच मध्ये समोर आले आहे कि फोनच्या मागे सर्कुलर रियर कॅमेरा मॉड्यूल आणि फिंगरप्रिंट सेंसर असेल.

हे देखील वाचा : पावरफुल फोन Realme 8 वेबसाइट वर झाला लिस्ट, पुढल्या वर्षी 8GB रॅम सह करेल एंट्री

काही दिवसांपूर्वी रशियन सर्टिफिकेशन वेबसाइट वर TA-1322 मॉडेल नंबर असलेला एक नोकिया स्मार्टफोन दिसला होता. एका जुन्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि हा फोन Nokia 4.4 म्हणून लॉन्च होऊ शकतो. पण 91Mobiles च्या एका रिपोर्ट मध्ये Nokia 7.3 चा एक वर्जन असेल असे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी नोकियाचे दोन सर्टिफिकेशन्स साइट TUV Rheinland वर स्पाॅट केले गेले आहेत. इथे एक फोनचा मॉडेल नंबर CN110 सांगण्यात आला आहे तर दुसरा नोकिया फोन WT340 मॉडेल नंबर सह लिस्ट झाला आहे. लिस्टिंग मध्ये दोन्ही स्मार्टफोन्सच्या बॅटरी कपॅसिटीचा खुलासा केला गेला आहे. सर्टिफिकेशन्स नुसार CN110 मॉडेल नंबर असलेल्या स्मार्टफोन मध्ये 4,500एमएएचची बॅटरी मिळेल तसेच WT340 मॉडेल नंबर असलेला स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरी सह लाॅन्च केला जाईल. लिस्टिंग नुसार हे दोन्ही नोकिया स्मार्टफोन फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतील.

हे देखील वाचा : Jio ने पुन्हा केली अनलिमिटेड काॅलिंग फ्री, सर्व नेटवर्क वर करता यईल मोफत कॉलिंग

Nokia ने या महिन्यात Nokia C1 Plus आणि Nokia 5.3 सारखे स्मार्टफोन टेक मंचावर सादर केले आहेत तसेच भारतीय बाजारात पण आपला लो बजेट स्मार्टफोन Nokia 2.4 विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. यावर्षी कोरोना वायरसमुळे नोकिया ब्रँडचे बहुप्रतीक्षित स्मार्टफोन Nokia 9.3 PureView आणि Nokia 8.3 लाॅन्च होऊ शकले नाहीत.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here