Reliance Jio ला चांगलेच माहित आहे कि भारतीय ग्राहकांना काय हवे आहे आणि कंपनी आपल्या ग्राहकांना दतेच देत आहे. कंपनीची सुरवातच मोफत सर्विसने झाली होती आणि काही दिवसांतच जियो युजर्सची संख्या कोटींमध्ये पोहोचली होती. Jio आता पुन्हा आपल्या युजर्ससाठी शानदार भेट घेऊन आली आहे. जियो नेटवर्क वर वाॅयस काॅलिंग पुन्हा अनलिमिटेड फ्री होणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि 1 जानेवारी पासून IUC चार्ज हटवले जातील.
Jio ने अधिकृतपणे घोषणा करून सांगितले आहे कि कंपनी नवीन वर्षापासून म्हणजे 1 जानेवारी 2021 पासून आपले IUC म्हणजे इंटरकनेक्ट यूजेज चार्ज काढून टाकणार आहे. त्यानंतर रिलायंस जियो युजर देशात कोणत्याही नेटवर्क वर कितीपण वेळ बोलू शकतील. विशेष म्हणजे आतापर्यंत जियो टू जियो नेटवर्क वर वाॅयस काॅलिंग तो पूर्णपणे फ्री होती पण जियो वरून दुसऱ्या नेटवर्क वर काॅल करण्यासाठी अतिरिक्त रक्कम द्यावी लागत होती.
पण आता IUC काढून टाकल्यावर ऑफ-नेटवर्क काॅलिंग वरची मर्यादा पण रद्द झाली आहे. जियो युजर्सना कोणत्याही कंपनीच्या नंबर वर काॅल करण्यासाठी वेगळे चार्ज द्यावे लागणार नाहीत किंवा इतर नेटवर्क वर वाॅयस काॅलिंगसाठी कोणतीही मर्यादा नसेल. या बदलानंतर जियो ग्राहक देशात कोणत्याही नंबर वर अनलिमिटेड फ्री काॅलिंग करू शकतील.
हे देखील वाचा : 44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह OPPO Reno 5 लाॅन्च, यात आहे 50W SuperVOOC टेक्नोलाॅजी
Jio Phone 2.0
रिलायंस जियो बद्दल अलीकडेच एक रिपोर्ट समोर आला होता ज्यात सांगण्यात आले होते कि हि कंपनी भारतीय बाजारात अजून एक 4जी फीचर फोन लाॅन्च करण्याची योजना बनवत आहे. हा मोबाईल फोन 2021 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजे मार्च पासून मार्केट मध्ये एंट्री घेईल. या नवीन Jio Phone फोन बद्दल रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि याची किंमत आधीच्या जियोफोन पेक्षा थोडी जास्त असेल पण किंमत 1,000 रुपयांपेक्षा कमी असेल.
Jio Phone बद्दल या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि हा डिवायस पण 4G VoLTE कनेक्टिविटी सर्विस सह लाॅन्च केला जाईल. रिपोर्टनुसार हा नवीन मोबाईल फोन नसून कंपनी जुना Jio Phone रिलाॅन्च केला जाईल. फोन रिलाॅन्च करण्यामागे कंपनीचा उद्देश नवीन ग्राहक जोडण्याचा आहे. तसेच सांगण्यात आले आहे कि जियो फोन पुन्हा लाॅन्च करून कंपनी देशात ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देऊ इच्छितो.
















