सुश्मिता सेनच्या Aarya Season 3 ची शूटिंग झाली सुरु, प्रोमो देखील आला समोर

Highlights

  • Arya चा सीजन 3 डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल.
  • Arya Season 3 ची शूटिंग सुरु झाली आहे.
  • Arya मध्ये यावेळी बॉस लेडीच्या रूपात दिसेल सुश्मिता.

सुश्मिता सेनच्या धमाकेदार वेब सीरीज Arya चा सीजन 3 लवकरच ओटीटीवर येणार आहे. या वेब सीरीजचे 2 सीजन आधीच Disney Plus Hotstar वर रिलीज झाले आहेत. तर, आता ‘आर्या 3’ चा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोनंतर स्पष्ट झालं आहे की या सीरीजच्या नव्या सीजनची शूटिंग सुरु झाली आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये सुश्मिताचा खूप खतरनाक अंदाज दिसत आहे. या सीरिजच्या प्रोमोला नेटकऱ्यांनी उचलून धरलं आहे.

Aarya Season 3 Promo Video

डिज्नी प्लस हॉटस्टार आणि सुश्मिता सेन यांनी हा प्रोमो सोशल मीडिया चॅनेल इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. प्रोमोमध्ये सुश्मिता सेनचा खतरनाक लुक समोर आला आहे. काळ्या रंगाचा ओव्हरकोट, डोळ्यांवर गॉगल, एका हातात सिगार आणि दुसऱ्या हातात बंदूक असा तिचा डॅशिंग अवतार प्रोमोमध्ये दिसत आहे. या प्रोमोच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे की, ‘ती येत आहे आहे आणि मजबूत इराद्यांसह. हॉट स्टार स्पेशल्सच्या आर्या 3 ची शूटिंग सध्या सुरु आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर लवकरच रिलीज होईल. #AaryaS3OnHotstar’

आर्याचे दोन्ही सीजन प्रेक्षकांना भरपूर आवडले होते. पहिल्या सीजननंतर दुसऱ्या आणि दुसऱ्यानंतर तिसऱ्या सीजनची मागणी करण्यात आली होती, ज्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. अद्याप या सीरिजची रिलीज डेट समोर आली नाही. परंतु असं बोललं जात आहे की यंदा Arya Season 3 रिलीज केला जाईल. माहितीनुसार राम माधवानी निर्मित आर्या सीजन 3 मध्ये सुश्मिता सेन व्यतिरिक्त सिकंदर खेर आणि विकास कुमार देखील असतील. आशा आहे की यावेळी नवीन सीजनमध्ये आणखी नवीन पात्रांचा समावेश केला जाईल.

राजस्थान मध्ये घडणारी ही क्राइम थ्रिलर गोष्ट आर्या सरीन (सुष्मिता) च्या भोवती फिरते जी एका माफिया गँगमध्ये आहे आणि आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लेडी डॉन बनते. या वेब सीरीजमध्ये सुश्मिताच्या भूमिकेचं कौतुक मोठ्या प्रमाणात करण्यात आलं आहे. 2021 मध्ये या सीरिजचा दुसरा सीजन आला होता ज्यात सुश्मिता आपल्या सर्व शत्रूंचा खात्मा करते आणि मुलांना घेऊन देश सोडते. आता सगळं शांत होण्याऐवजी तिचा डाव तिचाय्वर उलटणार आणि तिचा आणखी एक शत्रू आहे, त्याचीच एन्ट्री नव्या सीझनमध्ये दाखवली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here