Samsung च्या वादानंतर आता Xiaomi आणि Oppo ने ब्रँड स्टोर वर दिली Amazon Pay ची सेवा

ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेलर्स मधील वाद आता वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी मोबाईल रिटेलर्सनी याविरोधात आवाज उठवला होता. तसेच अलीकडेच ऑफलाइन रिटेलर्सनी सॅमसंगच्या विरोधात बंद पुकारला होता आणि तीन दिवस Samsung फोन विकणार नाही ते सांगितले होते. त्या मागे कारण होते Samsung ने ऑफलाइन रिटेलसाठी अमेझॉन पे सोबत केलेली भागीदारी. पण कंपनी या माध्यमातून मोबाईल ग्राहकांना अतिरिक्त डिस्काउंट देण्याचा दावा करत होती. तर रिटेल स्टोर्सने डेटा अमेझॉनला विकण्याचा आरोप केला होता. या प्रकरणानंतर सॅमसंग ने Amazom Pay ऑफर मागे घेतली आणि सेल बंद केला. पण हे प्रकरण अजून संपले नसताना Xiaomi आणि Oppo ने आपल्या ऑफलाइन ब्रँड स्टोर वर हि Amazom Pay सर्विस चालू केली. इथे पण जवळपास तीच प्रक्रिया वापरली जात आहे जी सॅमसंगने सुरु केली होती.

Xiaomi आणि Oppo ने आपल्या रिटेल पार्टनर सोबत हि सर्विस चालू केली नाही त्यामुळे रिटेलर्सनी याचा विरोध केला नाही. कंपन्यांनी आपल्या ऑफलाइन ब्रँड स्टोर वर अमेझॉन पे सर्विस चालू केली आहे आणि यात पण यूजरला 5 टक्के किंवा 500 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक दिला जात आहे. तसेच ओपो फोन वर अमेझॉन पे चा वापर केल्यास 1,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे. जरी हे रिटेल पार्टनर सोबत केले जात नाही त्यामुळे याचा विरोध होत नाही पण डेटा चोरी किंवा डेटा विकण्याची भीती यात पण आहे.

याबाबत जेव्हा आम्ही मोबाईल रिटेल असोशिएशनशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी यावर आक्षेप घेतला नाही. निकुंज पटेल, सेक्रेटरी- गुजरात मोबाईल असोशिएशन, याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले कि “शाओमी आणि ओपोची ऑफर फक्त त्यांच्या ब्रँड स्टोर पर्यंत मर्यादित आहे त्यामुळे कोणत्याही रिटेलर्सचा डेटा कंपनीला जात नाही त्यामुळे आम्हाला याबाबत कोणताही आक्षेप नाही.”

पण हे काही अंशी खरे आहे कि यात रिटेलर्सचा डेटा कंपनी सोबत शेयर होत नाही पण ज्या कारणांमुळे सॅमसंगचा विरोध केला जात होता त्यातील एक कारण असे पण होते कि कंपनी अमेझॉन पे च्या माध्यमातून सीसीआई (Competition Commission of India) मध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या विरोधात चालू असलेल्या केस मध्ये फायदा करण्याचा प्रयत्न करत आहे. टीमउळे जरी आता शाओमी आणि ओपोने ब्रँड स्टोर वर हि सेवा सुरु केली असली तरी ऑफलाइन वरून ऑनलाइनला फायदा तर होत आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here