Airtel 5G in India: 5G नेटवर्कचा सर्वात बेस्ट स्पेक्ट्रम मिळवल्याचा एयरटेलचा दावा

देशातील प्रमुख टेलीकॉम कंपनी एयरटेलनं अधिकृतपणे कंफर्म केलं आहे की ते भारतातील 5G क्रांती लीड करण्यासाठी तयार आहेत. एयरटेलनं सांगितलं आहे की त्यांनी संपूर्ण भारतासाठी 19,800 MHz स्पेक्ट्रमचे 3.5Gz आणि 26Gz बँड मिळवले आहेत. तसेच कंपनी मिड बँड स्पेक्ट्रम मजूबत करण्यासाठी काम करत आहे. एयरटेलनुसार, त्यांनी या स्पेक्ट्रम लिलावासाठी सरकारकडे एकूण 43,084 कोटी रुपये जमा केले आहेत. एयरटेलनं या लिलावात 5G स्पेक्ट्रम 20 वर्षांसाठी मिळवले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील इंडस्ट्रीतील सर्वात चांगले स्पेक्ट्रम मिळवल्यामुळे कंपनीला येत्या अनेक वर्षांपर्यंत स्पेक्ट्रमसाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही.

Airtel चं 5G इकोसिस्टम आहे तयार

एयरटेलकडे आता देशभरात सर्वात जास्त मोबाईल ब्रॉडबँड स्पेट्रम आहे, जो कंपनीला भारतात 5G क्रांती सुरु करण्यासाठी सर्वात योग्य दावेदार बनवतो. कंपनीच्या मते गेल्या अनेक वर्षांपासून ते टेलीकॉम इंडस्ट्रीचे नेतृत्व करत आहेत. तसेच एयरटेलनं भारतात आपल्या अनेक पार्टनर्ससह मिळून 5G टेक्नॉलॉजी टेस्ट देखील केली आहे.

एयरटेलनं हैद्राबादमध्ये आपल्या 4G नेटवर्कवर भारतातील पहिला 5G एक्सपीरियंस टेस्ट केला आहे. तसेच भारतात ग्रामीण भागात पाहिलं 5G ट्रायल देखील कंपनीनं केलं आहे. त्याचबरोबर कंपनी 5G क्लाउड गेमिंग एक्सपीरियंस देखील टेस्ट करत आहे. एयरटेल आपल्या 5G इकोसिस्टमवर देखील काम करत आहे. कंपनी नेक्स्ट जेनेरेशन नेटवर्क टेक्नॉलॉजी वेगानं आत्मसात करण्याची तयारी करत आहे.

एयरटेलची स्ट्रॅटेजी किती फायदेशीर

एयरटेलनुसार, त्यांनी बऱ्याच नियोजन आणि रिसर्चसह स्पेक्ट्रम मिळवलं आहे. त्यांच्याकडे लो आणि मिड बँड स्पेक्ट्रम (Sub Ghz/1800/2100/2300 Band) चा एक मोठा पूल आहे, ज्याचा वापर करून ते आपल्या ग्राहकांना सर्वात बेस्ट 5G कव्हरेज ऑफर करतील. तसेच 3.5 GHz आणि 26 GHz बँड एयरटेलला कमी खर्चात 100 पट जास्त कव्हरेजसाठी मदत करतील.

एयरटेल आपल्या स्ट्रॅटेजीमुळे Ghz बँड विकत घेण्यापासून वाचली, त्यामुळे त्यांची कोट्यवधींची बचत झाली आहे. एयरटेलनुसार, ते आपल्या स्पेक्ट्रमच्या माध्यमातून युजर्सना 100 पट कपॅसिटीसह चांगला 5G एक्सपीरियंस देतील. तसेच कमी किंमतीत 5G स्पेक्ट्रम विकत घेतल्यामुळे भविष्यात त्याचा स्पर्धात्मक फायदा मिळेल. म्हणजे एयरटेल 5G ची किंमत कमी करण्याची योजना आखात आहे.

Airtel 5G चा स्पीड

काही दिवसांपूर्वी कंपनीनं हैद्राबाद 5G टेस्टिंग दरम्यान आपल्या नेटवर्कवर 3Gbps (3,000Mbps) चा फास्ट स्पीड मिळवला होता. याची तुलना Jio 5G च्या ट्रायल स्पीडशी केल्यास हा तीन पट जास्त आहे. या स्पीडच्या मदतीनं एक मोठा चित्रपट देखील काही सेकंदात डाउनलोड करता येईल. परंतु 5G आल्यानंतर अस्सल स्पीड कमी होण्याची शक्यता देखील टाळता येत नाही तरीही 4जी स्पीडपेक्षा जवळपास 10 पट जास्त वेग मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here