5G लाँचच्या आधी जाणून घ्या Airtel ची खास तयारी; SIM, Plan आणि Speed असेल टकाटक

Jio 5G Phone Launch Price 8000 To 12000 In India Reliance Jio Ultra-Affordable 5G Smartphone

5G Launch in India: 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव 26 जुलै म्हणजे मंगळवारी सुरु होणार आहे, ज्यात कमीत कमी 4.3 लाख कोटी रुपयांच्या एकूण 72 गीगाहर्ट्ज स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या लिलावात Airtel, Reliance Jio, Vodafone Idea आणि Adani Group अशा बड्या नावांचा समावेश असेल. तसेच, 5G Auction आधीच भारतात 5G च्या सुरुवातीबाबत केंद्र सरकारनं इशारा देखील दिला आहे की मार्च 2023 पर्यंत ही सेवा लाँच केली जाऊ शकते. भारती एयरटेलचे चेयरमन सुनील मित्तल यांनी म्हटलं आहे की, भारताच्या डिजिटल-फर्स्ट अर्थव्यवस्थेला सपोर्ट करण्यासाठी कंपनी आपल्या शक्तीशाली नेटवर्कसह देशात 5जी कनेक्टिव्हिटी आणण्यासाठी सर्वात पुढे असेल. त्यामुळे Airtel 5G Launch कधी होईल, Airtel 5G Sim कसे मिळतील, Speed किती असतील, कोणत्या नेटवर्कवर काम करेल आणि Airtel 5G Plan कसे असतील, असे प्रश्न लोकांच्या मनात येणं साहजिक आहे. या लेखात आम्ही हीच माहिती दिली आहे.

Airtel 5G ची खासियत

  • Airtel 5G इंडिया लाँच डेट
  • Airtel 5G चा स्पीड
  • Airtel 5G नेटवर्क
  • Airtel 5G सिम

Airtel 5G इंडिया लाँच डेट: लवकरच गुड न्यूज

अलीकडेच केंद्रीय कॉम्युनिकेशन मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली आहे की, टेलीकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 5G मोबाईल सर्व्हिस सुरु करू शकतात. यावरून स्पष्ट झालं आहे की, 5G नेटवर्क मार्च 2023 पर्यंत लाँच केलं जाऊ शकतं. अन्य कंपन्यांप्रमाणे Airtel कडून अधिकृतपणे 5G नेटवर्क लाँचची माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, सुनिल मित्तल यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं आहे की देशात 5जी कनेक्टिव्हिटी आणण्यात एयरटेल सर्वात पुढे असेल असेल, त्यामुळे स्पष्ट झालं आहे की सर्वप्रथम 5जी सर्व्हिस लाँच करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत एयरटेलच्या नावाचा समावेश असेल.

एयरटेलचे मॅनेजिंग डायरेक्टर गोपाल विट्टल यांनी म्हटलं आहे की कंपनी 5जीसाठी पूर्णपणे तयार आहे.तसेच आम्हाला बातमी मिळाली आहे कंपनी यंदाचं आपली 5जी सर्व्हिस लाँच करू शकते. कंपनी आपल्या 5जी सर्व्हिसची जाहिरात पुढील काही महिन्यांत सुरु करणार आहे.

Airtel 5G चा स्पीड

काही दिवसांपूर्वी कंपनीनं हैद्राबाद 5G टेस्टिंग दरम्यान आपल्या नेटवर्कवर 3Gbps (3,000Mbps) चा फास्ट स्पीड मिळवला होता. याची तुलना Jio 5G च्या ट्रायल स्पीडशी केल्यास हा तीन पट जास्त आहे. या स्पीडच्या मदतीनं एक मोठा चित्रपट देखील काही सेकंदात डाउनलोड करता येईल. परंतु 5G आल्यानंतर अस्सल स्पीड कमी होण्याची शक्यता देखील टाळता येत नाही तरीही 4जी स्पीडपेक्षा जवळपास 10 पट जास्त वेग मिळू शकतो.

Airtel 5G नेटवर्क: मोठी योजना

मित्तल यांनी सांगितलं आहे की, भारतात 5जी क्लाउड गेमिंग अनुभव देणारी आणि ग्रामीण कनेक्टिव्हिटीसाठी 700 मेगाहर्ट्ज बँड यशस्वी टेस्टिंग करणारी एयरटेल पहिली कंपनी आहे. त्यामुळे कंपनी 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावात 700 मेगाहर्ट्ज बँडवर बोली लावू शकते, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर सब 6गीगाहर्ट्ज बँडचा देखील वापर केला जाऊ शकतो. भारतात 5जी ची एनएसए नेटवर्क टेक्नॉलॉजी मिळण्याची शक्यता आहे.

Airtel 5G प्लॅन: महाग असेल सर्व्हिस

Airtel 5G चे टॅरिफ खूप महाग असण्याची शक्यता आहे. परंतु कंपनीनं अजूनतरी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. काही दिवसांपूर्वी कंपनीचे सीटीओ रणदीप यांनी म्हटलं होतं की जर तुम्ही जागतिक स्थरावर पाहिलं तर 5G आणि 4G टॅरिफमध्ये जास्त फरक दिसत नाही. त्यामुळे आशा आहे की भारतात 5जी प्लॅन 4जी टॅरिफसारखे असतील. परंतु काही महिन्यांपूर्वी सुनील भारती मित्तल यांनी म्हटलं होतं की कंपनी आरपियू 600 रुपयांच्या आसपास नेऊ इच्छिते. तेव्हा त्यांनी 5जीचा उल्लेख केला नव्हता. आरपीयू म्हणजे अ‍ॅव्हरेज रेवेन्यू पर युजर जो वर नेण्यासाठी 5जी सर्वात महत्वाचं ठरू शकतं. अर्थात तुम्हाला आता महागड्या सर्व्हिससाठी तयार राहावं लागू शकतं.

Airtel 5G SIM

Airtel 5G SIM बाबत देखील सध्या कोणतीही माहिती मिळाली नाही. 5G Network देणाऱ्या टेलीकॉम कंपनी आपल्या ग्राहकांना नवीन सिम कार्ड देतील. काही रिपोर्ट्सनुसार 5जी नेटवर्क अ‍ॅक्सेस करण्यासाठी कोणतंही नवीन सिम कार्ड घ्यावं लागणार नाही. 5जी स्मार्टफोनमध्ये 4जी सिमवरून देखील 5जी नेटवर्क अ‍ॅक्सेस करता येईल.

यावर्षी डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशंस (DoT) नं माहिती दिली होती की भारतात 5G रोलआउट केल्यानंतर भारतातील 13 शहरांमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस मिळेल. 2022 मध्ये अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगढ, गांधीनगर, गुरुग्राम, हैद्राबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनऊ, पुणे, दिल्ली आणि मुंबई सारख्या शहरांमध्ये सर्वप्रथम 5G सर्व्हिस मिळेल. परंतु डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशननं अधिकृतपणे सांगितलं नाही की कोणती टेलीकॉम ऑपरेटर देशात 5जी सर्व्हिस कमर्शियली सर्वप्रथम रोल आउट करेल. 5G ऑक्शननंतर काही दिवसांनी चित्र स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here