Home बातम्या Jio च्या आधी Airtel चे 5G नेटवर्क झाले तयार, जाणून घ्या कधी होईल लॉन्च, किती मिळेल स्पीड

Jio च्या आधी Airtel चे 5G नेटवर्क झाले तयार, जाणून घ्या कधी होईल लॉन्च, किती मिळेल स्पीड

भारतीय टेलीकॉम सेक्टर मध्ये आता कोण सर्वप्रथम आपल्या युजर्सना 5G सेवा उपलब्ध करवून देईल याची स्पर्धा सुरु झाली आहे. अलीकडेच रिलायंस जियोने अमेरिकेत आपल्या 5जी टेक्नोलॉजीचे यशस्वी परीक्षण केले होते. तर आता एयरटेलने हि कामगिरी करून दाखवली आहे. पण, जियोच्या पुढे एक पाऊल टाकत भारती एयरटेलने हि टेस्टिंग भारतातील टेक सिटी हैद्राबाद मध्ये केली आहे.

हैदराबाद मध्ये एका कर्मिशियल नेटवर्क वर LIVE 5G सेवेचे यशस्वी प्रदर्शन करणारी एयरटेल देशातील पहिली दूरसंचार कंपनी बनली आहे.

5G डाउनलोड स्पीड

सध्याच्या टेक्नोलॉजीच्या तुलनेत Airtel 5G 10x स्पीड, 10x लेटेंसी आणि 100x कंसीलर देऊ शकते. विशेष म्हणजे, हैद्राबाद मध्ये वापरकर्ते 5जी फोन वर सेकंदात एक मोठा चित्रपट डाउनलोड करू शकतात.

हे देखील वाचा : खुशखबर! 64MP कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी असलेला Mi 10T झाला खूप स्वस्त, जाणून घ्या

एयरटेल ग्राहकांना कधी मिळेल 5G

ग्राहकांसाठी 5जी उपलब्धतेबाबत कंपनी म्हणते कि जेव्हा आवश्यक स्पेक्ट्रम उपलब्ध होईल आणि सरकारची मंजूरी मिळेल तेव्हा हि सेवा एयरटेल युजर्सना दिली जाईल. कंपनीने अजूनतरी कोणतीही तारीख सांगितली नाही.

भारती एयरटेलचे एमडी आणि सीईओ, गोपाल विट्टल यांनी म्हटले, “मला आमच्या इंजिनियर्स वर खूप गर्व आहे, ज्यांनी आज टेक सिटी, हैद्राबाद मध्ये या अविश्वसनीय क्षमतेचे प्रदर्शन केले. आमची प्रत्येक गुंतवणूक भविष्यात हैद्राबाद मधील हि टेस्ट गेम चेंजिंग सिद्ध होईल. एयरटेल अशी क्षमता प्रदर्शित करणारा पहिला ऑपरेटर बनला आहे आणि आम्ही पुन्हा दाखवून दिले आहे कि हम भारतात नेहमीचीच भारतीयांना सशक्त बनवण्याच्या आमच्या शोधात नवीन टेक्नॉलॉजीचे नेतृत्व करण्यात आम्ही पहिल्या नंबर वर असतो.”

अलीकडेच बातमी समोर आली होती कि टेलिकॉम कंपन्या जसे कि Bharti Airtel, Vodafone–Idea (Vi) आणि Reliance Jio दूरसंचार विभाग (DoT) वर नवीन स्पॅक्ट्रमसाठी दबाव टाकत आहेत. अंतर्राष्ट्रीय टेलिकॉम यूनियन (ITU) ने अलीकडेच नवीन 26 Ghz mm (milimeter) wave अप्रूव केली होती. जगभरातील टेलिकॉम कंपन्या या बॅंड वर आधारित अल्ट्रा फास्ट वायरलेस ब्रॉडबॅंड सर्विस अडॅप्ट करत आहेत.

हे देखील वाचा : TikTok लवर्सची शेवटची आशा पण संपली, भारतातील पुनरागमनाचे दरवाजे झाले बंद

दुसरीकडे टेलिकॉम कंपन्यांचा म्हणणे आहे कि NFAP ने ITU द्वारे अप्रूव केलेल्या नवीन 26 GHz 5G बॅंड आपल्या डॉक्यूमेंट मध्ये अपडेट केला पाहिजे. हा बॅंड ग्लोबली अडॅप्ट केला जात आहे. भारतात पण हा बॅंड आला पाहिजे.