TikTok लवर्सची शेवटची आशा पण संपली, भारतातील पुनरागमनाचे दरवाजे झाले बंद

भारत सरकारने 59 चीनी ऍप्स वर कायमस्वरूपी बंदी घातली आहे, ज्यात टिकटॉक, वीचॅट, युसी ब्राउजर आणि इतर अनेक ऍप्सचा समावेश आहे. गेल्या वर्षी जून 2020 मध्ये या ऍप्स वर निर्बंध घालण्यात आले होते. पण, बॅन झाल्यानंतर अनेक दिवस असे रिपोर्ट्स समोर येत होते कि भारतात लोकप्रिय शॉर्ट व्हिडीओ मेकिंग ऍप TikTok चे पुनरागमन होऊ शकते. पण, आता समोर आलेल्या बातमीने TikTok लवर्सच्या शेवटच्या आशेवर पण पाणी फेरले आहे.

असे वाटत आहे कि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे डेटा सुरक्षा कायद्यांबाबत उपरोक्त ऍप्सच्या डेवलपर्सद्वारे देण्यात आलेल्या प्रतिक्रियामुळे समाधान झाले नाही. भारतात कायमचे बॅन झालेल्या पॉप्युलर चायनीज ऍप TikTok नंतर PUBG बद्दल पण बातम्या येत आहेत कि पबजी मोबाईल कमबॅक करू शकतो. परंतु, सरकारने PUBG Mobile India ला मंजुरी देण्यास मागे नकार दिला होता. तरीही अनेक दिवसांपासून अशाप्रकारच्या बातम्या समोर येत आहेत कि कंपनी लवकरच कमबॅक करू शकते.

रॉयटर्सच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि TikTok ची मूळ कंपनी बाइटडांसची योजना भारतीय कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याची आहे. कंपनीने The Wire वेबसाइटला माहिती दिली आहे कि आम्हाला सुरवातीला वाटले होते कि परिस्थिती लवकरच ठीक होईल. पण जर आमचे ऍप्स बंद राहणार असतील तर आम्ही सर्व कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेऊ शकत नाही. आम्हाला माहित नाही कि आम्ही भारतात कधी पुनरागमन करू.

यामुळे कायमचे बॅन झाले ऍप्स

Ministry of Electronics and Information Technology (MeitY) च्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि भारतात गेल्या जून मध्ये सर्वप्रथम जे 59 चायनीज ऍप्स बॅन केले होते, ते आता कायमचे बॅन करण्यात आले आहेत.

208 चीनी ऍप्स वर लागला आहे बॅन

सरकारने आतापर्यंत एकूण 208 चीनी ऍप्स वर बंदी घातली आहे. बाकी ऍप्स सुरवातीच्या 59 प्रमाणेच कायमचे बॅन होतात कि नाही हे आता बघावे लागेल.

10 कोटींपेक्षा जास्त होते युजर्स

टिकटॉकचे भारतात 10 कोटींपेक्षा जास्त युजर्स होते आणि यातील हजारो लोकांची टिकटॉकमुळे कमाई होत होती. पबजीचे पण भारतात लाखो चाहते होते, हा गेम बॅन झाल्यानंतर अलीकडेच या गेमका पर्याय म्हणून मेड इन इंडिया FAU:G गेम सादर केला गेला आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here