खुशखबर! 64MP कॅमेरा आणि 5,000एमएएच बॅटरी असलेला Mi 10T झाला खूप स्वस्त, जाणून घ्या

Xiaomi ने गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये शक्ती प्रदर्शन करत भारतात आपला 64एमपीचा कॅमेरा असलेला Mi 10T लॉन्च केला होता. पण, आता त्या युजर्ससाठी आनंदची बातमी आहे जे हा फोन विकत घेण्याचा विचार करत आहेत कारण मी 10टीच्या किंमतीत 3,000 रुपयांची कपात झाली आहे. कंपनीने लॉन्चच्या वेळी फोनची किंमत 35,999 रुपयांपासून सुरु केली होती.

नवीन किंमत

वर सांगितल्याप्रमाणे Xiaomi ने Mi 10T च्या लॉन्च किंमतीत 3,000 रुपयांची कपात केली आहे. मी 10टीचा 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 35,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण, आता हा 32,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच, या फोनचा 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 37,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण, कपातीनंतर फोन 34,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा : Redmi Note 10 चा लॉन्च आला जवळ, Xiaomi अधिकाऱ्यांनी सीरीज केली टीज

Mi 10T Pro

इथून विकत घ्या फोन

विशेष म्हणजे कपात केल्याची कंपनीने अजूनतरी कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही, पण हा फोन कमी किंमतीत Flipkart आणि Mi.com वरून विकत घेता येईल. मी 10टी कॉस्मिक ब्लॅक आणि लुनर सिल्वर कलर ऑप्शन मध्ये विकला जात आहे.

स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi 10T मध्ये 20:9 आस्पेक्ट रेशियो आणि 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.67 इंचाचा मोठा फुलएचडी+ डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, स्क्रीन 144Hz रिफ्रेश रेट वर काम करते जी ट्रिपल कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.

हे देखील वाचा : Exclusive : Mi 11 आणि Redmi Note 10 सीरीज येत आहे भारतात, बघा Xiaomi चा संपूर्ण प्लान

Mi 10T Pro

फोटोग्राफीसाठी फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट आहे. शाओमी मी 10टी स्मार्टफोन मध्ये एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर आहे. तसेच या फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा अल्ट्राक्लियर पंच-होल कॅमेरा देण्यात आला आहे.

पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000एमएएचची दमदार बॅटरी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. फोनच्या छोट्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

शाओमी मी 10टी व्हिडीओ

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here