Categories: बातम्या

जियो, एयरटेल आणि वोडाफोन-आइडियाचे 1 वर्षाची वैधता असलेले प्लान, बघा कोणता आहे बेस्ट

इंडियन टेलीकॉम इंडस्ट्री मध्ये सध्या प्रत्येक कंपनी स्वतःला प्रतिस्पर्धी कंपनी पेक्षा चांगली सिद्ध अररण्यामागे लागली आहे. एखाद्या कंपनी ने एखादा नवीन प्लान आणला तर त्या प्लानला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्या अजून चांगला प्लान सादर करतात. गेल्या काही दिवसांत रिलायंस जियो, वोडाफोन-आइडिया आणि एयरटेल ने आपल्या यूजर्ससाठी वार्षिक प्लान सादर केले आहेत जे 365 दिवसांच्या वैधतेसह येतात. या तिघांपैकी कोणती कंपनी जास्त बेनिफिट देत आहे आणि कोणता प्लान तुमच्यासाठी फायदेशीर आहे बघा:

एयरटेल

एयरटेल ने 1,699 रुपयांचा प्लान सादर केला आहे जो 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. फायदे पाहता यूजर्सना 1,699 रुपयांमध्ये एकूण 1 वर्षासाठी अनलिमिटेड वॉयस कॉलची सुविधा मिळेल. हे वॉयस कॉल विना एफयूपी लिमिट चालतील आणि लोकल, नॅशनल तसेच रोमिंग मध्ये फ्री असतील. अशाप्रकारे प्लान मध्ये 365 दिवस रोज 100एसएमएस मिळतील जे नॅशनल नेटवर्क वर चालतील. एयरटेल या प्लान मध्ये दैनिक वैधतेसह 365जीबी डेटा देत आहे. यूजर्स एका दिवसात अधिकतम 1जीबी डेटा वापरू शकाल. हा डेटा 4जी नेटर्वक सोबत 3जी आणि 2जी नेटवर्क वर पण चालेल.

रिलायंस जियो

जियो ने पण त्याच किंमतीत म्हणजे 1,699 रुपयांचा वार्षिक प्लान जाहीर केला आहे. किंमतीत हा प्लान एयरटेल सारखा आहे पण बेनिफिट पाहता हा एयरटेल पेक्षा जास्त डेटा देत आहे. या प्लान मध्ये 365 दिवस रोज 1.5जीबी इंटरनेट डेटा दिला जात आहे. तसेच दैनिक लिमिट संपताच इंटरनेट 64केबीपीएस स्पीडने चालत राहील. संपूर्ण वर्षासाठी या प्लान मध्ये एकूण 547.5जीबी 4जी डेटा मिळेल. जियो नेटवर्क वरून पण यूजर संपूर्ण देशात अनलिमिटेड वॉयस कॉल (एफयूपी​ लिमिट सह) करू शकतील. तसेच रोज 100 एसएमएस पण मिळतील.

वोडाफोन-आइडिया

वोडाफोन आणि आइडिया एक झाल्यामुळे हि देशातील सर्वात मोठी टेलीकॉम कंपनी बनली आहे. वार्षिक वैधता असलेल्या प्लानच्या स्वरूपात कंपनी ने 1,499 रुपयांचा प्रीपेड प्लान सादर केला आहे. एयरटेल प्रमाणे या प्लान मध्ये पण संपूर्ण वर्षासाठी एकूण 365जीबी डेटा मिळेल. या डेटाचा वापर एका दिवसात अधिकतम 1जीबी केला जाऊ शकतो. संपूर्ण 1 वर्षासाठी अनलिमिटेड वॉयस कॉलची सुविधा मिळेल. हे वॉयस कॉल एफयूपी लिमिट विना चालतील आणि लोकल, नॅशनल तसेच रोमिंग मध्ये फ्री राहतील. तसेच प्लान मध्ये 365 दिवस रोज 100एसएमएस मिळतील जे नॅशनल नेटवर्क वर चालतील. एयरटेल या प्लान मध्ये दैनिक वैधतेसह 365जीबी डेटा देत आहे. यूजर्स दिवसात अधिकतम 1जीबी डेटा वापरू शकतील.

Published by
Siddhesh Jadhav