Toshiba ने 43 इंच, 50 इंच आणि 55 इंचाचा QLED TV भारतात केला लाँच, किंमत 26,999 पासून सुरू

Toshiba C450ME टीव्ही सीरिज भारतात लाँच झाली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीने 3 स्क्रीन साईज मॉडेलला सादर केले आहे, ज्यात 43 इंच, 50 इंच आणि 55 इंचाची स्क्रीन साईज मिळते. फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, हा टीव्ही 4K रिजोल्यूशन quantum dot LED पॅनल्ससह येतो. तसेच हा Dolby Vision Atmos सर्टिफाईड आहे. या टीव्हीमध्ये स्मार्ट कनेक्टिव्हिटी पण मिळते, ज्याद्वारे तुम्ही OTT ॲप्सला स्ट्रीम करू शकता. याव्यतिरिक्त, हा टीव्ही VIDAA TV ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये तुम्हाला Alexa आणि VIDAA व्हॉईस काला सपोर्ट पण मिळतो. चला जाणून घेऊया या टीव्हीची किंमत आणि सर्व फिचर्सची माहिती.

Toshiba C450ME QLED 4K TVs 2024: किंमत, उपलब्धता आणि ऑफर

कंपनीने Toshiba C450ME QLED 4K TVs मध्ये तीन स्क्रीन साईज सादर केली आहे. यामध्ये 43 इंच, 50 इंच आणि 55 इंचाच्या मॉडेलचा समावेश आहे. 43 इंचाच्या मॉडेलची किंमत 26,999 रुपये आहे. तसेच, 50 इंचाच्या मॉडेलला तुम्ही 32,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याचा 55 इंचाचा मॉडेल 37,999 रुपयांना आहे.

सेलबद्दल बोलायचे झाले तर Toshiba C450ME QLED 4K TVs मध्ये 43 आणि 50 इंचाच्या मॉडेलची सेल 7 मे पासून Flipkart आणि Amazon वर सुरु झाली आहे. तसेच, 55 इंचाच्या मॉडेलची माहिती सध्या समोर आलेली नाही. ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, या Toshiba टीव्हीला 7 मे आणि 31 मे च्या मध्ये खरेदी केल्यावर Disney+Hotstar आणि JioCinema Premium चे 1 वर्षाचे पर्यंतचे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.

Toshiba QLED 4K TVs 2024: Features

फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या Toshiba C450ME QLED 4K TVs मध्ये तीन 43 इंच, 50 इंच आणि 55 इंचाचा quantum dot LED डिस्प्ले मिळतो. याचे रिजोल्यूशन 4K आहे. यामध्ये Dolby Vision आणि HDR10+ ला सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच REGZA Engine ZR सह येतो, जो की 4K कंटेंट क्वॉलिटी वाढवतो. तिन्ही टीव्हीमध्ये पातळ बेजल्स देण्यात आले आहेत, जो की व्यूविंग एक्सपीरियंसला आणि चांगले बनवतो. ऑडियोसाठी यामध्ये REGZA Power Audio आणि Dolby Atmos ला सपोर्ट असणारे स्पिकर्स देण्यात आले आहेत.

तुम्हाला सांगतो की, Toshiba चा हा टीव्ही VIDAA TV ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. तसेच यामध्ये सपोर्टसाठी Alexa आणि VIDAA काला सपोर्ट देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, या टीव्हीमध्ये Netflix, Disney+Hostar, Amazon Prime Video, JioCinema सारखे ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस पण मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here