Realme GT 6T किंमत किती असेल? येथे पाहा सर्व मॉडेलची लीक झालेली किंमत

रियलमीने घोषणा केली आहे की ते या महिन्यात भारतात आपल्या ‘जीटी’ सीरिजला सादर करत Realme GT 6T लाँच करेल. कंपनीचा दावा आहे की रियलमी जीटी 6 टी भारताचा पहिला Snapdragon 7+ Gen 3 चिपसेट असलेला फोन असेल. तसेच या मोबाईलच्या मार्केटमध्ये येण्याच्या आधाी याची किंमत इंटरनेटवर लीक झाली आहे.

Realme GT 6T किंमत (लीक)

  • 8GB RAM + 128GB Storage = ₹29,999
  • 8GB RAM + 256GB Storage = ₹31,999
  • 12GB RAM + 256GB Storage = ₹33,999
  • 12GB RAM + 512GB Storage = ₹35,999

Realme app मध्ये रियलमी जीटी 6 टी ची किंमत समोर आली आहे जी 31,999 रुपये दाखविण्यात आली आहे. ​​टिपस्टरचा दावा आहे की हा मोबाईलच्या 8 जीबी+256 जीबी व्हेरिएंटची किंमत आहे. तसेच याला टिपस्टर संजू चौधरीने फोनच्या इतर मॉडेलची किंमत शेअर करत सांगितलं आहे की याचा 8 जीबी+128 जीबी व्हेरिएंट 29,999 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो.

लीकनुसार 12 जीबी+256 जीबी व्हेरिएंट 33,999 रुपये तसेच 12 जीबी+512 जीबी व्हेरिएंट 35,999 रुपयांमध्ये लाँच होईल. मात्र, कंपनीने फोनची नेमकी किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. फोनच्या लाँचची वाट पाहिली जात आहे.

realme GT 6T स्पेसिफिकेशन (अंदाजे)

परफॉर्मन्स : रियलमी जीटी 6 टी मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन 3 दिला जाईल. हा ऑक्टा-कोर प्रोसेसर 2.8GHz क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवतो, तसेच 1.5 मिलियनपेक्षा पण अधिक Antutu score मिळवला आहे.

डिस्प्ले : रियलमी जीटी 6 टी स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा पंच-होल डिस्प्ले पाहायला मिळू शकते जो 1.5 के रेजोल्यूशन असणार आहे. या फोनमध्ये ओएलईडी स्क्रीनचा वापर केला जाऊ शकतो ज्यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1600 निट्स ब्राईटनेस मिळण्याची शक्यता आहे.

बॅक कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा दिला जाऊ शकतो. याच्या बॅक पॅनलवर ओआईएक टेक्नॉलॉजीसह 50 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स 882 सेन्सर तसेच 8 मेगापिक्सल अल्ट्रावाईड आयएमएक्स 355 लेन्स मिळण्याची शक्यता आहे.

फ्रंट कॅमेरा : सेल्फी काढणे आणि रिल्स बनविण्यासाठी Realme GT 6T स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या मोबाईलमध्ये कंपनी सोनी आयएमएक्स 615 सेन्सरचा वापर करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here